Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ मार्च, २०२०

कोरोणा व्हायरस च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आनंद सागर बंद चा निर्णय


शेगाव प्रतिनिधी:शहर शासनाने कोरोना व्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागु करुन अधिसूचना निर्गमित केली आहे त्या नुसार सर्व सिनेमा गृह नाट्यगृह व्यायाम शाळा शाळा महाविद्यालये  तसेच कोचीग क्लासेस मंदिर मस्जिद यात्रा सुध्दा दि,20/ते 31/ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतल्या मुळे जिल्हा अधिकारी बुलढाणा यांच्या निर्देशानुसार आनंद सागर परीसरात होणारी संभाव्य गर्दी  लक्षात घेऊन श्री संत गजानन महाराज संस्थान ने आनंद सागर दि,20/3/2020 पासुन ते 31/03/2020 पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन तसे सुचना फलख सुध्दा आनंद सागर च्या गेट वर लावण्यात आले 

आहे तर नगर परिषद कडुन सुध्दा कोरोना  विषाणु संक्रमण चा धोका टाळा साधे सोपे उपाय पाळा असे मोठमोठाले होल्डिंग बोर्ड लावण्यत आले आहे कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन नगर परिषद मंदिर सुध्दा प्रयत्न करीत आहे या कोरोना व्हायरस चा परीनाम शेगांव शहरत सडका मंदिर मंदिर परीसर ओस पडला आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध