Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून शेगावातील आठवडी बाजार बंद



सध्या COVID-19 (कोरोना व्हायरस) या आजाराचा प्रादुर्भाव पसरलेला आहे. या आजाराची साथ पसरू नये. म्हणुन दिनांक
१७/०३/२०२० मंगळवार रोजी शेगांव शहरात भरणारा आठवडी बाजार स्थगित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांची निर्देशानुसार बुलढाणा नांदुरा मलकापूर आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले होते तसेच आरोग्य सभापती ज्योती चांडक यांनी आज सकाळपासूनच लाऊडस्पीकर द्वारे कोरोना या संसर्ग जन्य विषाणू संदर्भात जनजागृती करून शेगांव शहरात असलेला मंगळवारचा आठवडी बाजार खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य सभापती ज्योती चांडक यांनी RNO शी बोलताना दिली आहे.

शेगाव तालुक्यातील सर्व नागरीकांनी याची नोंद घेवून बाजार भरवू नये व बाजारासाठी कोणीही येवू नये अशा प्रकारचे परिपत्रक नगरपरिषद कडून जाहीर करण्यात आले आहे.

नगर परिषद शेगाव 
आरोग्य सभापती- सौ
ज्योती अशोक चांडक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध