Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
सीएएला विरोध पडला महागात; भाजप नेत्यावर पक्षाची मोठी कारवाई
मुंबई (प्रतिनिधी ) – देशात एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे तर दुसरीकडे याविरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. तर काही राज्यांनी सीएएला विरोध करणारे ठराव संमत केले आहेत. असाच ठराव परभणी नगरपरिषदेत मंजूर केल्याच्या कारणावरून भाजपने दोन मोठ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व सेलू नगरपरिषदेत सीएएच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. पालम नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष असलेले भाजपचे बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगरपरिषदेत नगराध्यक्ष असलेले विनोद हरीभाऊ बोराडे यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. याउलट ठरावाला मंजुरी दिली. याची गंभीर दखल घेत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा