Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
पानिपत च्या लढाईत मराठयांचे योगदान मोलाचे-खा. हेमंत पाटील नानक साई व छत्रपती वेल्फेअर ची पानिपत मध्ये शिवजयंती
पानिपत च्या लढाईत मराठयांचे योगदान मोलाचे-खा. हेमंत पाटील नानक साई व छत्रपती वेल्फेअर ची पानिपत मध्ये शिवजयंती
नांदेड:प्रतिनिधी:पानिपत च्या लढाईत मराठयांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन खा. हेमंत पाटील यांनी केले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंती निमित्त पानिपत (हरियाणा) येथे शिवजन्मोत्सव सोहळा खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सोहळ्याला हरियाणा असन्धचे आमदार शमशेर सिंग गोगी,नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,नांदेड महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ देशमुख,नानक साई फौंडेशन चे हरियाणा प्रदेश अध्यक्ष सरदार तेजिंदर सिंघ मक्कर,भाजपचे हरियाणा प्रभारी प्रशांत चौधरी रोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्यावतीने खासदार हेमंत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पानिपत च्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे, शत्रूचे बलाढ्य सैन्य बळ असताना हि मराठयांनी त्यांच्या मुकाबला केला. या लढाईत असंख्य मराठयांना आपले बलिदान द्यावे लागले. या मराठयांच्या पुढच्या पिढीतील लोक प्रतिकूल परिस्थितीत हि येथे स्वाभिमानाने जगत आहेत असे खा. हेमंत पाटील म्हनाले.
पानिपतमधील मराठ्यांच्या शौर्याची गाथा या भूमीत आजही ज्वलंत पाहून छत्रपती शिवरायांचे स्वराज्य खऱ्या अर्थाने अटकेपार गेल्याची भावना नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केली.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात शाहिद झालेल्या मराठा वीरांचे वंशज भाई जगबिरसिंग तोरणे व भाई राजबिर दाभाडे,भाई देसराज तुरण यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा