Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेगाव आगाराच्या २७ तिकीट मशीन नादुरुस्त...बसमध्ये साधे तिकीट : प्रवाशांमध्ये कुतूहल : वाहकांना त्रासदायक
शेगाव आगाराच्या २७ तिकीट मशीन नादुरुस्त...बसमध्ये साधे तिकीट : प्रवाशांमध्ये कुतूहल : वाहकांना त्रासदायक
शेगाव:शहरप्रतिनिधी:ग्रामीण भागात चालणार्या बसमध्ये वाहकाकडे पुन्हा जुने साध्या तिकिटाचा ट्रे दिसू लागले आहेत याचे कारण म्हणजे शेगाव आगारातील २७ तिकीट मशीन नादुरुस्त आहेत.
पाच वर्षापूर्वी आगाराला ६० मशिनी देण्यात आल्या होत्या. लोकांनाही मशिनच्या तिकिटाचा सवय झाली होती. मात्र मागील दोन ते तिन महिन्यापूर्वी २७ मशिनी नादुरूस्त आहेत. त्यामुळे शेगाव आगारातील ग्रामीण भागातील अर्धे शेडुल ट्रे मधील साध्या तिकिटावर चालत आहेत.
त्यामुळे पाच वर्षापासून एटीएम मशीन मधून तिकटाची सवय झालेल्या प्रवाशांकडूनही आता त्या साध्या पद्धतीच्या तिकिटाकडे कुतूहलाने पाहल्या जात आहे. शेगाव आगाराला मागील पाच वर्षांपूर्वी ६० एटीएम मशीन प्राप्त झाल्यावर त्यापैकी सत्तावीस मशिनी दोन ते तीन महिन्यापासून नादुरुस्त आहेत. सदरच्या नादुरुस्त मशिनी मुंबई येथे दुरुस्तीसाठी पाठवल्या आहेत. गत पाच वर्षापासून छोट्या मशीनची सवय झाल्याने नवीन वाहकांना विशेषतः
महिलांना वजनदार ट्रे मुळे त्रासाचे झाले आहे. तसेच ग्रामीण भागात काही बसेस भंगार अवस्थेत जात असल्याने रस्त्यातच बसेस बंद पडतात त्यामुळे नवीन बसेस देखील शेगाव आगराला देण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
#काही नादुरुस्त मशीनी दुरुस्तीला पाठवण्यात आलेल्या आहेत.
आपले शेड्युल बंद पडू नये यासाठी आधीच शेगाव आगारासाठी 50 लाखाची टिकीट बोलावली आहेत. 40 किलोमीटरच्या आत कमी टप्पा असलेल्या बसमध्येच हे जुन्या पद्धतीचे तिकीट मिळत आहेत लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये अजून मशीनद्वारे तिकिटं मिळतात.मशिनच्या बंद पडण्याची शक्यता असते त्याकारणाने मशिनीसोबतच साध्या तिकिटाचा ट्रे पण असतो. आता स्मार्ट कार्ड वाटप झाल्याने आधीच्या मशिनला अटॅच होत नाहीत.त्यामुळे लवकरच अपडेट मशिनी येतील, - सुभाष भिवटे आगरप्रमुख शेगाव
# शेगाव आगाराचे उत्पन्न जिल्ह्यातून सर्वाधिक....
शेगाव आगाराचे उत्पन्न जिल्यातील इतर आगारापेक्षा सर्वाधिक आहे. सर्वाधिक उत्पन्न असलेल्या आगाराला मशिनी व इतर सुविधा वरिष्ठांनी तात्काळ द्यायला पाहिजे. अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशाकडून होत आहे. तर शेगाव आगराकडून याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू असतानाही वरिष्ठ पातळीवरून हेलकवणी भेटत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...
-
शिरपूर प्रतिनिधी:- तालुक्यातील जमीन व्यवहारांमधील घोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच उघडकीस आलेल्या उंटावद शिवारातील आदिवासी...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा