Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२०
विषय :- गुडी पाडवा
सण करू साजरा
आहे संस्कृतीचा माजरा
नवं उभारणी करा
सृष्टी पाहुं जरा....
कडुस गोड करू
चैतन्य झालं सुरु
फुटली नवं पालवी
सूर्य तेजात आनंद पसरु....
सावली आपण मिळवू
संस्कृती दर्शन घडवु
दर्शन आईबाबांचं करू
प्रश्न सारे सोडवु...
निम पाला कडु
गुळ त्यात मिसळु
मात दृष्टावर करू
मार्गक्रमण ध्येयाने सुरु...
जुनं सारं विसरू
नवं आपण अंगिकारू
पूर्वज क्रांतिकारक महापुरुष
राजे संभाजी स्मरण करू....
गुडी नवचैतन्याची उभारू
नवं सारं स्वीकारू
बाजूला जुनं सारू
नवं वाट धरू...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055©®
विषय :- वेसन...
लागतंय तारुंण्यात वेसन
आकर्षणातुन सुरवात पण
अनंत प्रकार वेसनाचे
गुटखा तंबाखू दारूपण....
मटका सट्टा जुगार
चोरी मारामाऱ्या वासनांध
कुणाला लागतं कसलं
आगळा वेगळा छंद...
परिणाम होता त्याचे
आजारपण अवेळी म्हातारपण
वेसनाने येतं मरणपण
छंदात फंदात जेलफाशीपण....
डुंबतो संसार त्यांचा
त्रास होतो इतरांना
दुःख होतं कुटूंबास
पाहवत नाही यांना मरतांना....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
मो. 9922239055©®
गुडी पाडवा....
चैत्रातील गुडी पाडवा
वाढवतो मनात गोडवा
दुःख जुनं पळवा
संस्कृती नवी घडवा....
सृष्टीने टाकली कात
आपली नवं वाट
आली सुंदर पहाट
चढू चैतन्य घाट....
निंबाचा पाला कडु
गुळाचा गोडवा मिसळू
गुढी तोरण उभारू
पुरणपोळी खापरीवर घडू...
औरंग्याने लावल गालबोट
राजे संभाजी शेवट
स्मरण त्यांच करत
देश स्वराज्य आणु नवंपहाट....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
9922239055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा