Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीसांची कामगिरी शिरूर गावातील ए.टी.एम.मशीन चोरीचा गुन्हा उघड. चोरटे मुद्देमालासह पोलीसांच्या ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीसांची कामगिरी शिरूर गावातील ए.टी.एम.मशीन चोरीचा गुन्हा उघड. चोरटे मुद्देमालासह पोलीसांच्या ताब्यात
धुळे:प्रतिनिधी:दिनांक- २९/०२/२०२० रोजी रात्री शिरूड गावात सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे ए.टी.एम. ला पाच चोरट्यांनी वायरलूप लावून पीक अप गाडीच्या सहाय्याने ओढून ए.टी.एम. मशीन व त्यातील रोख रक्कम असे एकूण १४,०७,५००/- रूपये. चोरी करून नेले होते. ह्या गुन्ह्याची नोंद धुळे तालुका पोलीस स्टेशनला भाग ५ गु.र.नं. ७८/२०२० भा.द.वि कलम ३८०,४२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करणे हे पोलीसांपुढे मोठे अव्हान होते. मा. पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत व अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना सदर गुन्ह्याचे तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे कडे चालू असताना पोलीस निरीक्षक. शिवाजी बुधवंत, यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती की, सदरचा गुन्हा हा चॅम्पीयनसिंग मिलनसिंग भादा याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केलेला आहे असे आढळून आले होते त्या वरून त्यांनी पथकास आदेश देऊन त्यांचा शोध घेऊन तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्या वरून धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरातून ईसम नामे चम्पीयनसिंग मिलसिंग भादा यास तपासकामी ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की त्याने त्याचे चार साथीदारांच्या मदतीने दोन मोटार सायकली मोहाडी परिसरातून चोरून आणून त्याच्या वरून जाऊन अग्रवाल नगर येथेल पीक अप गाडी चोरून तिच्या मधून शिरूड गावात जाऊन तेथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे ए.टी.एम. चोरून आणले होते ते दंडेवाले बाबा नगर मधील एका घरात तोडून त्यातील पैसे सर्वांनी वाटून घेऊन ते नवकार नगर, सावळदे रोड, मोहाडी, येथील एका विहरीत टाकले होते. त्या नंतर पीक अप गाडी डेडरगाव तलावा जवळ सोडून दोन मोटारसायकली मोहाडी गावात सोडून दिल्या होत्या
त्या नंतर ताब्यातील संशयित आरोपी चॅम्पियन सिंग भादा याने दंडेवाले बाबा नगर, मोहाडी येथील ज्या घरात ए.टी.एम. तोडलेले होते त्या घरातून ए.टी.एम.चे स्पेअरपार्ट तसेच ए.टी.एम. तोडण्यासाठी लागणारे साहित्य, छनी, हातोडा, ईलेक्ट्रॉनीक कटरचे पाते ईत्यादी वस्तू तसेच नवकार नगर मधील एका विहरीतून ५०,००० हजार रूपये किंमतीचे DIE BOLD कंपनीच्या ए.टी.एम.चे पाच तुकडे तसेच ए.टी.एम. फोडून सदर आरोपींच्या हिश्यास आलेली १,००,०००/- रुपये असे एकूण १,५०,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ यांचे मार्गदर्शना खाली स्था.गु.शा. धुळे चे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील स.पो.नि. उमेश पाटील, पोलीस उप निरीक्षक- हनुमान उगले, अनिल पाटील, असई नथ्थू भामरे, पो.हे.कॉ. रफीक पठाण, संदिप थोरात, सुनिल विंचूपरकर, संजय पाटील, महेंद्र कापुरे, पो.ना.
प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, उमेश पवार, राहुल सानप, रविकिरण राठोड, विशाल पाटील, मुयर पाटील, श्रीशैल जाधव, योगेश जगताप, तुषार पारधी, मनोज बागुल, सागर शिर्के, चेतन कंखरे, मनोज पाटील,नितीन मोहने, वसंत पाटील, मायुस सोनवणे, विजय सोनवणे, महेश मराठे, मनोज ब्राम्हणे, किशोर पाटील, गुलाब पाटील, दिपक पाटील, विलास पाटील व केतन पाटील अशांनी केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्याचा प्रयत्न चालू आहे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा