Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
महिलादिन सप्ताह निमित्ताने कुरखळीत बेबी केअर किट चे वाटप व विविध स्पर्धांचे आयोजन
महिलादिन सप्ताह निमित्ताने कुरखळीत बेबी केअर किट चे वाटप व विविध स्पर्धांचे आयोजन
प्रतिनिधी:योगेश्वर मोरे: महिला व बाल कल्याण विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने २ मार्च ते ८ मार्च दरम्यान महिला दिनानिमित्ताने 'महिलादिन सप्ताह' राबविला जात असूनअंगणवाडी सेवकांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उपक्रमास महिलांसह पुरुषांचा मोठा सहभाग पहायला मिळत आहे.
कुरखळी ता. शिरपूर येथील अंगणवाडी क्रं १ व २ च्या वतीने आज दि ५ मार्च रोजी कुरखळी येथील प्रथम नागरिक व लोकनियुक्त सरपंच सिताराम भिल यांच्या हस्ते पहिले अपत्य असलेल्या मातांना ' बेबी केअर किट ' चे वाटप करण्यात आले.
याच सोबत ८ ते १० किशोरवयीन मुली व महिलांच्या सहभागाने रांगोळी स्पर्धाही रंगली. विविध प्रकारच्या रेखाटलेल्या कलाविष्कारातून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा संदेश दिला तर 'स्त्रीभ्रूण हत्या', 'हुंडाबंदी' सारख्या विषयांच्या आधारे सुंदर व बोलक्या प्रतिकृती महिलांनी आपल्या रंगोळीतून सादर केले. रांगोळी स्पर्धेतून उत्कृष्ठ रांगोळी काढणाऱ्या एका महिलेची निवड करून प्रोत्साहन म्हणून सरपंचांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी कुरखळी चे लोकनियुक्त सरपंच सिताराम भिल, अंगणवाडी क्रं. १ च्या कार्यकर्त्या संध्या मोरे, सह मदतनीस मनीषा मोरे तर अंगणवाडी क्रं. २ च्या कार्यकर्त्या सिमा मोरे सह मदतनीस लताबाई भिल, किशोरवयीन मुली, आशा सेविका ज्योती भिल, ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा