Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ मार्च, २०२०

सफाई कामात हलगर्जी केल्यास कार्यवाही होणार सौ. मीना लालवाणी



प्रतिनिधी:मलकापुर २२/३/२० कोरोना वायरस सारख्या संसर्गजन्य रोगाने जनजीवन विस्कळीत केले असुन सर्व नागरिकानमध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.या रोगाशी सामना करण्यासाठी व स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र व राज्य शासना कळून विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहेत.

त्या अनुषगाने अरोग्य समिति सभापति सौ. मीनाताई मुकेश लालवाणी यांच्या संकल्पनेतुन नगराध्यक्ष हरिषभाऊ रावळ यांच्या मार्गदर्शनात मलकापुर नगर परिषदच्या वतिने न.प.तील सर्व महिला व पुरूष सफाई कामगार कर्मचारी यांना मास्क,हेंड ग्लोज, गम बूट इत्यादि साहित्य वाटप करताना नगराध्यक्ष हरिषभाऊ रावळ,उपाध्यक्ष राशिदखाँ जमादार,अरोग्य सभापति सो.मीनाताई लालवाणी, नगरसेवक ऐजाज खान.त्या वेळी उपमुख्याधिकारी देशपांडे साहेब,आरोग्य अधिकारी भूषण वर्मा,योगेश घुगे,मिलिंद कंडारकार,आरोग्य प्रभारी यशवंत जगताप,संतोष पाटील,आरोग्य जमादार राजू जैन,सफाई कर्मचारी संघटना अध्यक्ष अण्णा ढंढोरे आदि अनेकजण उपस्थित होते.सर्व सफ़ाई कर्मचारी महिला व पुरूष ड्रैस कोड मध्ये उपस्थित होते.कोरोना वायरस चा प्रादुर्भाव पाहता नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

कोणताही संसर्गजन्य रोग पसरू नये त्यासाठी प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक दिवसाला दोन वेळ साफ सफाई करने(नाली सफाई व झाडू मारणे),नालीच्या बाजूला जंतु नाशक पॉवडर टाकने,जंतु नाशक फवारणी करणे, धुर फवारणी करणे, रस्त्यावर पडलेला कचरा ट्रक्टर द्वारे विल्हेवाट लावणे, कचरा घंटागाडी नियमित वेळेवर पाठवीने इत्यादि स्वछते बाबत अरोग्य सभापति सो.मीनाताई लालवाणी यांनी सूचना दिल्या वरील सूचनेचे पालन न केल्यास आरोग्य अधिकारी ,कर्मचारी,सफाई 

कर्मचारी,कंत्राटदार सफाई कर्मचारी त्यावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही होणार असा इशारा आरोग्य सभापति सो.मीनाताई लालवाणी यांनी दिला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध