Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

सञासेन विभागाच्यावतीने २१ मार्च- जागतिक वन दिन साजरा करण्यात आला_

_


सत्रासेन प्रतिनिधी ता चोपडा: येथे  वन विभागाच्यावतीने वृक्षलागवड करून जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. वाढदिवस का साजरा करतात व कशामुळे साजरा करतात असा प्रश्न सत्रासेन वनविभागाचे वनरक्षक एस.आर.भोई यांना विचारणा केली असता त्यांनी पुढील प्रमाणे सांगितले.

जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणा-या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणा-या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे. यासाठी वनदिन साजरा केला जातो.

शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. १९७१ मध्ये 'युरोपियन कॉनफीडरेशन ऑफ अॅग्रीकल्चर' च्या २३ वाया बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच 'वनांचे महत्व व त्यांचे संवर्धन' याविषयी जनजागृती करण्यासाठी २१ मार्चला दरवर्षी जागतिक वन दिन साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त या दिवशी जंगलांसंदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता या तीन महत्वाच्या घटकांबाबत जनजागृती केली जाते.

"निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व
अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे
संरक्षण व संगोपन करण्यासाठी
कटिबध्द होऊया...!!!"
असा संदेश त्यांनी ग्रामस्थांना दिला. कार्यक्रमासाठी उपस्थित वनरक्षक एस आर भोई,वनरक्षक श्रीमती एस एस भोई ,आर जटाले तसेच सत्रसेन गावांमधील पोलीस पाटील योगेश सोनवणे,हरित सेना सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध