Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ मार्च, २०२०

विदर्भ पंढरी शेगांवातून जनता कर्फ्यु च्या हाकेला भरभरून प्रतिसाद !



शेगांव:प्रतिनिधी नोवेल कोरोनाच्या वाढत्या संकटाला लक्ष्यात घेता प्रधानमंत्री मोदी यांनी गेल्या दिवशी सर्व भारतीय लोकांना संबोधित केले व या जागतिक संकटाची गांभीर्यता लक्ष्यात घेता देशाला जनता कर्फ्यु पाळण्याची हाक दिली. यावर सर्व देशासोबताच शेगांवातून भरभरून प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

शेगांव वासियांनी आपला सार्वजनिक संचार थांबवले असून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टँड,छत्रपती शिवाजी महाराज चौक,मंदिर रोड, आनंद सागर रोड,तथा महत्वाची चौके पूर्णतः बंद आहेत.

या व्हायरसची साखडी तोडण्यासाठी व त्याचा नाश करण्यासाठी अख्खा देश सकाळी ७ वाजेपासून लढत आहे ते ही घरात राहून, सार्वजनिक संपर्क तोडून या व्हायरस सोबत लढत आहेत तसेच शेगांव बस स्थानक स्वच्छ धुवून एस.टी कर्मचारी घेतलं आणि आज  पंतप्रधानांनी सर्व जनतेला संध्याकाळी ५ वाजता ०५ मिनिटे टाळी, शंख, टाळ, घंटी वाजून आपल्यासाठी जी लोक
समाजसेवेत आहेत म्हणजेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर व इतर
अधिकारी वर्ग ज्यांचा आपल्याला अभिमान आहे त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वांनी संध्यकाळी आपल्या घराबाहेरील अंगणात, बाल्कनीत उभे येऊन त्याचे अभिनंदन
करावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध