Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

सुरत ते बऱ्हाणपूर पायी प्रवास करणाऱ्या तरुणांना केळी व्हेपरचे वाटप



रावेर प्रतिनिधी तालुक्यातील सावदा  येथे सुरत हुन बऱ्हाणपूर कडे पायी निघालेल्या तरुणांना खाद्य म्हणून केळी व्हे प र देताना,युनिक प्रभू फूड प्रोडकटचे भूषण पाटील,हॉटेल न्यू सिमरन चे कुशल जावळे,राम होंडा शो रूम चे बंटी जंगले,युवराज महाजन,साईबाबा फूट वेअरचे बंडू जावळे,सचिन बऱ्हाटे, युवराज महाजन,सागर वंजारी.        
                                                सावदा: करोना व्हायरस मुळे देश भारत लोक डाऊन सुरू असल्याने सर्वत्र व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे काम धंदा नसल्याने शहरातील अनेक तरुण हे आपल्या गावाकडे निघाले आहेत.सुरत हुन बुऱ्हाणपूर कडे पायी निघालेले तरुण कामगार हे सावदा येथे पोहचल्यावर त्यांना येथील प्रभू बना ना चिप्स कंपनी तर्फे केळी व्हेपरचे वाटप करण्यात आले.  

                       
यावेळी  युनिक प्रभू फूड प्रोडकट चे भूषण पाटील,हॉटेल न्यू सिमरन चे कुशल जावळे,राम होंडा शो रूम चे बंटी जंगले,पत्रकार प्रवीण पाटील, साईबाबा फूट वेअर चे बंडू जावळे,सचिन बऱ्हा टे, युवराज महाजन,सागर वंजारी, वसीम शेख, आदी.उपस्थित होते.      

चौकट बऱ्हाणपूर जिल्ह्यातील बोरगाव येथील नरसिंह चारल,पीपल चांरंग,दादू चारंग,लक्षण चारांग,देव राज चरांग,आदी.तरुण हे सावदा फैजपूर रस्त्यावर पायी चालत जात असताना वाहनांना हात देऊन थांबविण्याची विनंती करीत  दिसले.त्यांची विचार पुस केली असता आम्ही बऱ्हाणपूर येथील असून सुरतहुन गावा कडे जाण्यासाठी तीन दिवसांपूर्वी पायी निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध