Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
देव आला धावूनी गरीबांच्या मदतीला.....मा.श्री.परेशभाई कोळी
आपल्या अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा नेते व महाराष्ट्र राज्याचे युवा राज्य अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांच्या कार्याला मानाचा मुजरा....
वैश्विक महामारी करोना-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थित संचारबंदी कलम १४४ आणी सोशल डिस्टंसिंग मुळे ठाणे येथील चेंदणी कोळी वाडा पश्चिम,सिडको बसस्टॉप जवळील बोगद्या जवळ रेल्वे चे काम गेल्या कित्येक दिवसांपासून चालू होते,त्या कामासाठी लागणारे मजदूरवर्ग हा मध्यप्रदेश,बिहार,युपी,उत्तरांचल प्रदेशातून आलेले आहेत परंतू सर्व देशात कोरोना-१९ च्या प्रादुर्भावाने २१ दिवसांचा लाॅकडाउन असल्याने या शेकडो रेल्वे कामगार कुटुंबियांवर (मजुरांवर) उपासमारीची वेळ आलेली होती त्यात त्यांचा संबंधित ठेकेदार(काॅन्ट्रक्टर)त्यांना अशा परिस्थित वार्यावर सोडून पसार झाला.
या घटनेची माहीती कोळी समाजाचे युवा नेते मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी यांना समजताच त्यांनी लागलीच धाव घेतली व सर्व शेकडो कुटुंबियांची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना राहण्यासाठी ठाणे येथील कोळी समाजाचे सभागृह उपलब्ध करून दिले व त्यांना दोन वेळेची जेवणाची व्यवस्था करून दिली व जो पर्यंत त्या सर्व कामगारांची पर्यायी व्यवस्था होत नाही तो पर्यंतची सर्वांची अन्न,पाणी व निवारा या तिन्ही गोष्टींची जबाबदारी मा.श्री.परेशभाई कोळी यांनी घेतली आहे.
परप्रांतिय रेल्वे कामगारांच्या शेकडो कुटुंबियांना उघड्यावर सोडून पडून गेलेल्या ठेकेदारावर शासनस्तरावर कार्यवाही व्हावी यासाठी मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्वाईन सी पी साहेब,डि एस पी साहेब यांना भेटून त्या मजूर वर्गाच्या समस्या त्यांचे निर्देशनास आणून देत सविस्तर चर्चा केली या कार्यक्रमाला स्वतः ज्वाईन सी पी साहेब,डि एस पी साहेब हजर राहून त्यांचे हस्ते शेकडो कुटुंबियांना जेवनाचे वाटप करण्यात आले तसेच सर्व प्रकारचे अन्नधान्य,कडधान्य,तेल,किराणा साहित्य देण्यात आले.
मा.श्री.परेशभाई चे कार्य आकाशाला गवसणी घालण्या सारखे आहे,त्यांच्या या कार्याची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे,अश्या आमच्या नेत्याला मानाचा मुजरा.....
संकलनः-अनिलदादा नंन्नवरे,खांदेश विभाग उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवा कार्य अध्यक्ष,अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि)शाखा महाराष्ट्र प्रदेश
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
Khup. Changle. Samajik. Kaam
उत्तर द्याहटवा