Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मार्च, २०२०

समाज संघटनांच्या मनोमिलनातुन समाज एकीकरण व्हावे.. श्री अर्जुनभोई



राज्यातील भोईसमाज सेवकांनी, विचारवंतांनी, कृतीवंतांनी दिलेला समाज एकीकरणाचा इशारा आम्ही गंभीरतेने घेत आहोत काय...? राज्यात समाज क्रांती घडवून आणण्याकरिता आपल्यातील संघटनांची एकरुपतेची जी व्याप्ती आज राज्यात काही ठिकाणी होत आहे तर काही ठिकाणी होतांना दिसत नाही तर ती वाढविणे हे सामाजिक एकीकरणाच्या काळासाठी आवश्यक आहे. 

समाज हक्कासाठी आपल्यातील समाज क्रांतीचा काळ जवळ आणण्याकरिता हेही अत्यंत महत्वाचे आहे. आज आम्ही अनेक संघटनांच्या माध्यमातून समाज एकीकरणाची व्याप्ती वाढवित आहोत की नाही...??? याबद्दल ही खुल्या दिलाने चर्चा झाली पाहिजे. अनेक समाज संघटनांच्या एकीकरणाची व्याप्ती जर वाढत नसेल आणि ती जर वैयक्तिक एकल संघटने पुरती विचार करुन मर्यादित असेल तर ती सामाजिक एकीकरणाच्या क्रांतीला पुरक अशी होऊ शकणार नाही... अशा वेळेस आम्ही फक्त वैयक्तिक संघटनांचाच विचार करीत बसलो आहोत असे ही स्पष्ट होईल. तरी राज्यातील समाज एकीकरणाची क्रांती ही सर्व समाज घटकाद्वारे होत असेल आणि समाज संघटनांनी समाज एकीकरणाची जाणीव स्वत:ला करुन घेणे हेही अति आवश्यक आहे तेव्हाच आमच्या भटक्या भोई समाजाच्या पुढे समाज एकीकरणास पोषक वातावरण निर्माण होईल आणि ते निर्माण करावयाचे मोठे कार्य हेही आपलेच किंबहुना समाज संघटनांचे असेल... समाज संघटनांची एकत्र व्याप्ती आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर समाज एकीकरण करणे हेही आपली प्रथम अट असली पाहीजे. 

समाज एकीकरण करण्याचे हे ईश्वरीय कार्य संपुर्ण समाज कार्यकर्त्यानी समजून घेतले पाहिजे. समाज एकीकरणाची व्याप्ती, त्याचे ध्येय्य निश्चिती, त्यासाठी भविष्यातील तयार करत असलेली ब्लूप्रिंट यावर सातत्याने विचार विनिमय होणेही अगत्याचे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध