Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मार्च, २०२०

सोनगीर तालुक्यातील सायणे शिवारातुन सप्टेंबर महिन्यात शेतातील विहीरीतील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी सोनगीर पोलीसांच्या ताब्यात


धुळे:प्रतिनिधी:सोनगीर तालुक्यातील सायणे शिवारातील शेतातील विहीरीवरुन इलेक्ट्रिक पाण्याची मोटार स्टार्टर वायरसह अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. सोनगीर पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून मुद्देमालासह चार जणांना अटक केली असून.

तालुक्यातील सायणे शिवारात अनिल बापुराव पाटील रा. सायणे यांच्या सायणे शिवारातील शेतातून 2 सप्टेंबर 2019 रोजी रात्री अज्ञात चोरट्यानी इलेक्ट्रिक मोटारसह स्टार्टर व वायर चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सोनगीर पोलिसात अनिल पाटील यांनी फिर्याद दिली होती. यावरुन सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सपोनि. प्रकाश पाटील यांच्या सुचनेनुसार सदर गुन्हाचा तपास पोना सदेसिंग चव्हाण करीत होते. 

चौकशी केली असता सदर गुन्हात 

1) सुनिल आनंदा देवरे (भिल) वय 24 , 
2)ज्ञानेश्वर राजू मोरे (भिल) वय22, 
3) पिरण उत्तम भिल वय 20 
4) योगेश हिलाल भिल वय 19 सर्व राहणार बोरीस ता. जि. धुळे यांना अटळ करण्यात आली असून त्यांनी चोरीची कबुली दिली. या गुन्हातील चोरीस गेलेल्या इलेक्ट्रिक पाण्याची मोटार व इतर सहा मोटारी अशा सात इलेक्ट्रिक पाण्याची मोटारी ३५ हजार किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून. अटक केलेल्या आरोपीकडून इतर आणखीन अशा प्रकारचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक. डॉ राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी. श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हाचा तपास सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक. प्रकाश पाटील व पोलीस उपनिरीक्षक. राजेंद्र पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक. यशवंत सुर्यवंशी, पोकॉ. अजय सोनवणे, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अनिल चौधरी, श्रीमती अतुल निकम, विकास सोनवणे, सुरज साळवे यांनी कारवाई केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध