Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ मार्च, २०२०

जनता कर्फ्यू’ला रावेर शहरासह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद



रावेर प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला रावेर शहरासह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.नागरिकांनी स्वयंस्फूर्तिने यात सहभाग नोंदवला .शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळाला 

शहर व परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता . रस्त्यावरील दुकाने शाळा,
आंबेडकर चौक ,गांधी चौक ,भोई वाडा, मोमीन वाडा, कारागीर नगर, शिवाजी चौक ,महात्मा फुले चौक, नागझिरी भाग, बस स्थानक, स्टेशन रोड सह संपुर्ण भागात शुकशुकाट होता .

उद्या पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करावे पालन झाल्यास करोना वायरस रोखण्यात यश मिळेल अत्यावश्यक सेवा सुरू असूनही तिथेही शुकशुकाट आहे 

उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी ठिक ठिकाणी पाहणी करून नागरिकांना आवाहन करत आरोग्याची दक्षता व काळजी  घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध