Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ मार्च, २०२०

जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातील नागरिकांन कढूण चांगला प्रतिसाद, रस्ते सुनसान



सत्रासेन प्रतिनिधी:- सुभाष पाटील    
सञासेन तालुका चोपडा:नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आज सत्रासेन गांवात गावकरी जनता कर्फ्यूचे समर्थन करताना दिसत आहेत. रस्ते सुनसान असून, जनता घरात आहे. नेहमीची वाहनांची वर्दळ सकाळपासून थांबली आहे.

कोरोना विषाणू, अर्थात कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. 

त्यानुसार आज रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुणी आवश्यकता नसल्यास घरातून बाहेर पडू नये, जे कर्मचारी आणि नागरिक या साथीच्या आजाराशी मुकाबला करण्यासाठी काम करत आहेत अशा लोकांप्रती देशातील जनतेने आज संध्याकाळी ५ वाजता, पाच मिनिटांसाठी आभार व्यक्त करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध