Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १५.७० कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर
अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १५.७० कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर
शिरपूर:प्रतिनिधी:माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२० च्या अर्थसंकल्पात शिरपूर शहरासह तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी, संरक्षक भिंत व लहान पुलांसाठी एकूण १५ कोटी ७० लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरु आहे.
माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत भरघोस निधी मंजूर करून आणला आहे.
बोराडी ते न्यू बोराडी उमर्दे वकवाड पळासनेर रस्ता प्रजिमा ५ किमी २/०० ते ८/४०० मध्ये रुंदीकरणासह बांधकाम करणे, तालुका शिरपूर जिल्हा धुळे १ कोटी ७५ लक्ष रुपये, शिरपूर निमझरी बोराडी रस्ता इजिमा ३९ किमी ४/०० ते११/०० चे बांधकाम करणे १ कोटी ५५ लक्ष रुपये, प्रजिमा ९ ते अनेर डॅम रस्ता ग्रामा ९४ किमी०/०० ते ३/०० चे बांधकाम करणे व किमी २/५०० मध्ये उजव्या बाजूस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये, नांदर्डे ते वासर्डी रस्ता ग्रा मा ३२ किमी ०/०० ते ३/०० चे बांधकाम करणे ९० लक्ष रुपये, रा. मा. - ४ ते भाटपुरा ग्रा मा ८७ किमी ०/०० ते ३/०० चे संरक्षण भिंतीसह रस्ता बांधकाम करणे ९० लक्ष रुपये, हिसाळे महादेव रस्ता प्रजिमा ९ किमी ३/८००, ६/९००, ७/३००, ९/६०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे व किमी ०/०० ते १४/४०० मध्ये जलनिस्सारण, संरक्षक कामे करणे ९० लक्ष रुपये, रा. मा. ४ ते तांडे ग्रा मा १३ किमी ०/०० ते २/०० चे सा क्र ०/१०० मध्ये लहान पुलांचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये, लालमाती खंबाळे रस्ता ग्रा मा - ११६ किमी ०/०० ते ५/०० चे बांधकाम करणे २ कोटी रुपये, सुळे रोहिणी भोईटी रस्ता प्रजिमा- ८ किमी ६/६०० ते १०/८०० चे बांधकाम करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सलाईपाडा ते नवाधाबापाडा बोराडी रस्ता किमी ०/०० ते ७/०० चे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये, कोडीद ते उमरपाडा रस्ता ग्रामा १७२ किमी १/०० ते ५/०० ची सुधारणा करणे १ कोटी रुपये, रा. मा. १ ते आपसिंगपाडा रूपसिंगपाडा ते फत्तेपूर रस्ता ग्रा मा १०८ चे रस्ता बांधकाम करणे ४० लक्ष रुपये, चोंदी झेंडेअंजन पनाखेड रस्ता प्रजिमा६ किमी १०/०० ते १२/०० मध्ये रुंदीकरणसह जलनिस्सारण काम करणे १ कोटी २० लक्ष रुपये असे एकूण १५ कोटी ७० लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त् करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा