Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ मार्च, २०२०

तालुक्यातील मस्कावद सिम व म सस्कावद खु.




या दोन ग्राम पंचायतीच्या दि. ३१ मार्च  रोजी  होवु घातलेल्या  पंचवार्षिक  निवडणुकी साठी  आज उमेदवारी  अर्ज  दाखल करण्याचे अंतीम दिवसा अखेर दोन्ही  ग्रा.पं. च्या मिळुन एकुण सोळा  जागांसाठी चाळीस उमेदवारी अर्ज  दाखल झालेले आहेत.यात मस्कावद खु. येथील  सहा जाग बिनविरोध  निवडून आलेल्या आहेत.

मस्कावद  सामना ग्रा.प.च्या नऊ जागांसाठी ही निवडणुक  होत आहे यात प्रभाग एक  व दोन मधुन प्रत्येकी  तीन जागांसाठी  प्रत्येकी अकरा अर्ज प्राप्त  झालेले आहेत प्रभाग  तीन मधुन तीन जागांसाठी  दहा अर्ज प्राप्त झालेले आहेत.

निवडणूक  निर्णय अधिकारी  म्हणून  पं.स. विस्तार अधिकारी  सी.आर. महाले हे काम पहात आहेत.

मस्कावद खु. येथील  ग्रामीण.पं. च्या सात जागांसाठी  आठ अर्ज  प्राप्त झालेले आहेत. 

यात प्रभाग  एक मधुन  तीन जागांसाठी  तीनच उमेदवारी  अर्ज प्राप्त  झाल्याने यात सुरेखा  मिलींद कोळी, निकीता  चंद्रकांत कोळंबे, गिरीधर महारु सपकाळे तर प्रभाग  दोन मधुन ज्ञान प्रीतम  पाटील बिनविरोध  तर महिला राखीव एकाजागे साठी दोन उमेदवार रिगंणात आहेत.

प्रभाग तीन मध्ये दोन जागा साठी कल्पना  राजीव तायडे  व कुदंन विजय बेंडाळे याचे  एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित  आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पं.सं कार्यालयीन अधीक्षक  जी एस. रेंडे हे काम पहात आहेत  दरम्यान  उमेदवारी  अर्जाची दि .१७ रोजी  छाटणी होणार आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध