Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ मार्च, २०२०

शेगाव शहरात मुख्यमंत्र्याचे आदेश मांडले बाजारात


शेगांव / प्रतीनीधी : संपूर्ण जगासह भारत देशातही कोरोना व्हायरसने थैमान माजवला आहे. करण्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना शासन राबवितांना दिसत आहे. त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शालेय विभागापासून तर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक तसेच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्रित येऊन गर्दी करु नये म्हणून शाळा महाविद्यालय यांना 31 मार्चपर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली आहे 

त्याचबरोबर धार्मिक स्थळे ही 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा. यांनी दिलेले आहे असे असतानाही शेगाव शहरातील आठवडी बाजार आज काही प्रमाणात भरलेला दिसून आला. मुख्यमंत्र्यांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका शक्यतो प्रवास टाळा अशा सूचना दिलेले असतानाही आज शेगाव शहरात मात्र हे सर्व नियम व मुख्यमंत्र्यांचे आदेश येथील आठवडी बाजारात मांडलेली दिसून आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध