अमळनेर i संपादक
- संतोष भोई
कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील अतिप्राचीन ,अतिदुर्मिळ
मंगळग्रह मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी त्वरित व तात्काळ बंद करण्यात यावे.
मंगळग्रह मंदिरावर दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ,बाहेरील राज्यातून व
देश भरातून भक्तगण येत असतात.
कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर
देशातील ताजमहल व महाराष्ट्रातील अतिप्राचीन अशी धार्मिक स्थळावर
भाविकांना बंदी करण्यात आली आहे किंबहुना ती ऐतिहासिक व धार्मिक स्थळे बंद
देखील करण्यात आली आहेत.कोरोनो हा आजार संसर्गजन्य असल्याने लोकानी समूह करून एका
ठिकाणी जमा होवू नये असे आव्हान देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदिजीनी
केले आहे .

मंगळग्रह मंदिरावर देश भरातून भाविक येतात .मंगळ ग्रह मंदिरावर मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी प्रचंड गर्दी येत
असते गर्दी करून पूजा अर्चा व प्रसादाचा
लाभ भाविक भक्त गण घेतात .त्यामुळे माणसांची मांदियाळी व गर्दी इथे दररोज पाहायला
मिळते .१७ मार्च २०२० रोजी देखील मंगळवार असल्याने मोठ्या प्रमाणात भक्त
भाविकांनी गर्दी केली होती व गर्दी होत राहील .त्यामुळे देशातील व इतर
राज्यातून मोठ्या शहरातून येणाऱ्या भक्त
भाविकांमुळे अमळनेर तालुक्यात कोरोनो व्हायरस पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत
नाही.याची गांभीर्याने नोंद व दखल
घेण्याची गरज प्रशासनाची आहे व राहील .कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भविष्यात
होणाऱ्या संसर्गजन्य आजाराला आजच पायबंद
घालण्यासाठी मंगळग्रह मंदिर भक्त भाविकांच्या दर्शनासाठी त्वरित व तात्काळ बंद
करण्यात यावे. तालुक्यात मास्क वाटणे सुरु असून त्याचे योग्य नियोजन होणे
गरजेचे आहे . मास्क लावून कोरोनो व्हायरसचा
पुर्ण पणे पायबंद होवू शकत नाही. तसेच मास्क व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाकणे देखील
गरजेचे आहे . sanitizer व soap वाटल्यास आणि हात धुण्याविषयी जागरूकता निर्माण केल्यास
जास्त उपयोग होईल या सर्व उपाय योजनांचा प्रसार आपल्या आरोग्य विभागातील कर्मचारी
यांच्याकडून होणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा