Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मार्च, २०२०

मुलांच्या शाळेला जी सुट्टी दिली आहे,ती गंमत म्हणून दिली नाही,



मुलांच्या शाळेला जी सुट्टी दिली आहे,ती गंमत म्हणून दिली नाही,जो जीवघेणा कोरोना नावाचा संसर्गजन्य व्हायरस पसरतो आहे त्याला प्रतिबंध म्हणून ही सुट्टी जाहीर केली आहे,कारण लहान मुलं ही लगेच कोणाच्याही संपर्कात येतात,त्यांना स्वच्छतेची जाणीव नसते,चांगलं वाईट समजत नाही म्हणून ही मुले एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या सहज आहारी जाऊ शकतात, म्हणून घरात मुले राहतील तर ती जास्त लोकांच्या संपर्कात येणार 

नाहीत,त्यांच्या पालकांचे त्यांच्याकडे लक्ष राहील,सुयोग्य आहार घेतील,तसेच स्वतःच्या स्वच्छ तेकडे लक्ष देतील, संसर्ग होणार नाही व त्यामुळे कोरोना सारख्या आजाराला बळ मिळणार नाही,हा सुट्टी देण्यामागचा प्रशासनाचा हेतू आहे…..
म्हणून पालकहो मुलांना सुट्टी लागली म्हणून मामाच्या, किंवा इतर नातेवाईक यांच्या गावाला पाठवू नका, त्यांना पिकनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, सहल इत्यादी ठिकाणी पाठवू नका, सुट्टी आहे म्हणून त्यांना बाजार, यात्रा महोत्सव, इ ठिकाणी पाठवू नका किंवा तुम्ही ही जाऊ नका,आपले घर,शेती,शाळेचा अभ्यास इ 
मध्ये त्यांचे मन रमवा...

प्रत्येक विषयाचा दररोज सराव घ्या.; प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका सराव, लेखन,वाचन यांचा सराव घ्या...;

फोन,वॉट्सअप्प, मेसेज या माध्यमातून आपल्या पाल्याच्या शिक्षकांच्या संपर्कात राहा, आपले सर्व शिक्षक आपणास सुव्यवस्थित मार्गदर्शन करतील,होमवर्क वगैरे देतील,पण मुलांच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका... आपल्या शंका ,अडचणी नक्की विचारा, मुलांना अनोळखी व्यक्तींच्या, परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात जाऊ देऊ नका, बाहेरील वस्तू खाऊ देऊ नका, उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम, बर्फ गोळा, आईस कांडी, पाणीपुरी,भेळ अशा वस्तूंपासून चार हात दूर ठेवा..

फक्त पुढचा आठवडा आपल्याला जपायचे आहे,आणि या कोरोनावर विजय मिळवायचा आहे.. असे महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंत बाल विद्यामंदिरचे प्राध्यापक श्री राजेंद्रजी लाड सर यांनी पालकांना महत्वपूर्ण सुचेना पत्रकारांशी बोलताना दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध