Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० मार्च, २०२०
घ्या!लग्नाची हौस फिटली,वधू -वर आईवडीलांसह भटजीही पोलीसांच्या ताब्यात
जळगाव प्रतिनिधी: करोनामुळे सध्या सगळी भीतीचं वातावरण आहे. आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारही प्रतिबंधात्मक पावलं उचलतं आहे.
गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक उपाय सरकारनं हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून गर्दी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. मात्र, हे आदेश धुकावून लावत लग्नाची हौस करणं चांगलंच अंगलट आलं आहे. त्यामुळे वधू-वर, त्यांचे आईवडिल आणि भटजीही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
माजलगाव शहरापासून १किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास लग्नासाठी पाहुणे जमले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली . यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेऊन लग्नस्थळी गेले असता, यावेळी पोलिसांना लग्नस्थळी १००- १२५ लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी करोना संसर्गाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली व जमलेल्यांना पाहुण्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला. त्यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. यानंतर ५-६ नातेवाईकांनी सदरचे लग्न उरकुन घेतल्याची माहिती आहे. या घटनेनं येत्या काही दिवसात लग्न असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये खळबळ माजली आहे.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा –
विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा . ब्रम्हगाव ता . माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे (रा लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे (रा . लवुळ (नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे (रा . लवुळ) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा