Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ मार्च, २०२०

धुळे जिल्हा पोल्ट्री फार्म असोसिएशनच्या वतीने चिकन फेस्टिव्हलचे आयोजनात धुळेकरांनी घेतला चिकन बिर्याणीचा अस्वाद


धुळे:प्रतिनिधी:मांसाहारी पदार्थ सेवन केल्याने कोरोनाची बांधा होत असल्याचे संदेश समाज माध्यमातून लोकांपर्यंत पसरल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी मांसाहार बंद केल्याने मुळे याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांना होत आहे. 

तसेच मांसाहाराने कोरोना व्हायरसची लागण होत असल्याची निव्वळ अफवा असून अफवांना बळी पडू नये या उद्देशाने धुळे जिल्हा पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या वतीने पांझरा नदी किनारी असलेल्या चैपाटीवर चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते 

कोरोना व्हायरस मुळे ३० रुपयात चिकन बिर्याणी विकण्याची वेळ पोल्ट्री फार्मवर आली आहे. तसेच चिकन खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असून ते सर्वांनी खावे कोरोना व्हायरसच्या लागणमुळे चीन मध्ये अनेकाचा जीव गेला आहे. या आजाराविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले असून हा आजार मांसाहारातून मानवी शरीरात प्रवेश करत असल्याची

पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहे. यामुळे नागरिकांनी मांसाहार खाणे बंद केला आहे. मात्र त्यांचा फटका मोठ्या प्रमाणात पोल्टी व्यावसायिकांना बसला आहे. गेल्या महिनाभरात चिकनाच्या दरात ७० टकके घट झाली आहे. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांवर झाला आहे. त्यांना उत्पादन खर्चाच्या ३० टक्के दराने पक्ष्यांची विक्री करावी लागत आहे.

परिणामी गेल्या २८ दिवसात जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाला साडेपाच कोटीचा फटका बसला आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. तसेच चुकीच्या अफवेमुळे नागरिकांधील गैरसमज दूर व्हावा या उद्देशाने असोसिएशनच्या वतीने चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बापू खलाणे, तेजस गोटे, आर एन पाटील, किशोर पाटील, डॉक्टर. प्रदीप पवार, डॉक्टर. सुप्रिया भामरे,
संतोष शेठ पंजाबी, जयेश पाटील, 
महेंद्र बडगुजर, प्रमोद खैरनार, नंदकुमार कुराई, विकास जाधव,विषाल शर्मा, किशोर खैरनार, दिलीप साळुंखे,आदी मान्यवर उपस्थित होते आणि या महोत्सवात नागरीकांना ३० रुपयांत चिकन बिर्याणी, चिकन टिक्का, उकडलेली अंडी अशी थाळी देण्यात आली होती स्वस्त दरात बिर्याणी मिळत असल्याने खवय्यांनी चांगलाच अस्वाद घेतला  या फेस्टिव्हमध्ये २ हजार पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला होता


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध