Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मार्च, २०२०

कुटुंब अर्थसहाय्य योजनेत सहा लाभार्थ्यांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरित



प्रतिनिधी अमळनेर शुक्रवारी तालुक्यातील सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश आमदार अनिल पाटील हस्ते व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या उपस्थितीत अर्थसाहाय्य देण्यात आले.

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यात तालुक्यातील

कल्पना रवींद्र सूर्यवंशी आर्डी, जनाबाई संतोष अहिरे बोहरे, रत्‍नाबाई नवल कोळी मांडळ, जिजाबाई जिजाबराव भिल बोदर्डे, कोकीळाबाई बन्सीलाल भिल दहिवद खुर्द, छाया गौतम सैंदाणे मांडळ, शोभा लहू भिल कामतवाडी, सुमनबाई रमेश पारधी अमळनेर आदींना कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी वीस हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले त्यामुळे तहसीलदार मिलिंद वाघ हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध