Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १८ मार्च, २०२०
शेगांव संस्थान ३१ मार्च पर्यंत बंद : जिल्हाधिकारी सुमन चंद्रा
शेगांव i प्रतिनिधी - उमेश राजगुरे : संपूर्ण जगासह भारत देशातही कोरोना
व्हायरसने थैमान माजवला आहे. या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये
खबरदारी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना शासन राबवितांना दिसत आहे. त्याच अनुषंगाने
बुलढाणा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शालेय विभागापासून
तर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक तसेच
गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्रित येऊन गर्दी करु नये म्हणून शाळा
महाविद्यालय यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
शेगांव देवालय संस्थानाने जिल्हाधिकारी यांचे
आदेश पाळत देवालय बंद केले आहे. महाराष्ट्रात
अद्याप पावेतो काही संस्थाने आपल्या आर्थिक लाभासाठी धार्मिक स्थळावर गर्दी करून घेवून संस्थाने चालू
ठेवत असल्याचे चित्र आहे . धार्मिक स्थळे ही ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश माननीय
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिलेत .असे असतानाही शेगाव शहरातील आठवडी बाजार आज
काही प्रमाणात भरलेला दिसून आला. मुख्यमंत्र्यांनीही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका,
शक्यतो प्रवास टाळा अशा सूचना दिलेले असतानाही आज शेगाव शहरात मात्र हे सर्व नियम
व मुख्यमंत्र्यांचे आदेश येथील आठवडी बाजारात गुंडाळून ठेवलेले दिसून आले. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा