Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

करोना विषाणूंशी लढा देण्यासाठी जवाहर मेडीकल फाउंडेशन सज्ज ४० बेडच्या करोना वॉर्डचे महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते शुभारंभ




धुळे : प्रतिनिधी जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. राज्यभरात करोना विषाणूंचा धोका वाढून करोनाग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे. हा वाढता धोका ओळखून धुळयातही करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी धुळे महापालिका आणि जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हास्पीटलने पुढाकार घेतला आहे. 

याठिकाणी तब्बल ४० बेडच्या करोना वॉर्डचे आज  महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त  गणेश गिरी, जवाहर मेडिकल फाउंडशेनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, व्हाईस चेअरमन आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, उपप्राचार्य डॉ. आरती महाले, प्रा. डॉ. नितीन कुलकर्णी, प्रा. डॉ. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

 आतापर्यंत करोना व्हायरसमुळे जगभरात ४ हजारपेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर जगात १ लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली आहे. भारतातही ७० पेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाली असून महाराष्ट्रांतही करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, यवतमाळ, नाशिक, नगर आदी भागात रोजच करोना संशयित आढळत आहेत. धुळयातही करोना संशयितांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

धुळे येथे करोनाग्रस्तांसाठी विशेष व्यवस्था असावी म्हणून धुळे महापालिका आणि जवाहर मेडिकल फाउंडेशनचे एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय यांनी पुढाकार घेतला आहे. तब्बल ४० खाटांच्या करोना वॉर्डचे आज मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी  आयुक्त शेख यांनी करोनाशी सामना करण्यासाठी शासन तयार असून योग्य ते आवश्यक उपाय करण्यात येत आहे. 

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून आवश्यक त्या सूचनाही करण्यात येत आहे. करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी शासन पुढाकार घेत असून जवाहर मेडिकल फाउंडेशनही या कामात हातभार लावला आहे. याठिकाणी  आज ४० बेडच्या करोना वॉर्डचे उदघाटन करण्यात आले असून शासनाचे पूर्ण सहकार्य एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलला असणार आहे. जवाहर मेडिकल फाउंडेशनला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

या उपक्रमासाठी निंबा मराठे,  प्रशासन अधिकारी राकेश काकूस्ते, जनसंपर्क अधिकारी प्रवीण खरे आदींनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध