Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
जागतिक महिला दिनी रावेर पोलीस स्टेशन चे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळावे अशी भूमिका घेऊन पो नि रामदास वाकोडे यांनी सकाळपासुनच दक्षता कमिटी मेंबर महिलांचे हाती पो स्टे चे कामकाज सोपवून सुरु झाले होते.
जागतिक महिला दिनी रावेर पोलीस स्टेशन चे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळावे अशी भूमिका घेऊन पो नि रामदास वाकोडे यांनी सकाळपासुनच दक्षता कमिटी मेंबर महिलांचे हाती पो स्टे चे कामकाज सोपवून सुरु झाले होते.
रावेर:प्रतिनिधी:जागतिक महिला दिनी रावेर पोलीस स्टेशन चे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळावे अशी भूमिका घेऊन पो नि रामदास वाकोडे यांनी सकाळपासुनच दक्षता कमिटी मेंबर महिलांचे हाती पो स्टे चे कामकाज सोपवून सुरु झाले होते.
सकाळी त्यांची 09/00 वाजता हजेरी घेऊन पोलीस कसे दैनंदिन कामकाज करतात याची सविस्तर माहिती देऊन शहरातील मान्यवर महिला यांनी पोलीस स्टेशनला रांगोळी काढून परिसर सुशोभित करून कामकाज सुरु केले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी त्यांच्या अर्धांगिनी सौ सुनिता वाकोडे यांच्या सह आलेल्या सर्व महिलांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. पोलीस निरीक्षक पदाची धुरा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कांता बोरा यांनी सांभाळली.
सौ सुवर्णा भागवत, सौ कल्पना पाटील, सौ सुनिता डेरेकर, ठाणे अंमलदार सौ जयश्री शिंदे, गोपनीय विभाग सुषमा चावरे, कल्पना जाधव, गार्ड अंमलदार सौ वर्षा महाजन, सौ संगीता वाणी( क्राईम) अनुपमा कौशिक, अलका श्रावगे, आदींनी आपापली जबाबदारी पार पाडली.
तसेच "भरोसा सेल" चे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रंजनाताई पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत उदघाटन केले असता महिला पोलीस कॉन्स्टेबल माधवी मोरे, पो कॉ योगेश चौधरी, पो कॉ मंदार
पाटील,पुरुषोत्तम पाटील,विकास पहुरकर यांनी पोलीस काका,पोलीस दीदी,बडी कॉब संदर्भात माहिती दिली,तसेच पोलीस खात्यासंदर्भात महिलांच्या समनंधीत गुन्ह्या संदर्भात कलमांची माहिती देऊन प्रश्न मंजुषा कार्यक्रम झाला,नमूद वेळी महिला दक्षता कमिटी,नारी शक्ती एकटा मंच रावेर,शारदा महिला मंडळ रावेर यांनी व इतर प्रतिष्ठित महिलांना हिरीरीने भाग घेतला ,तसेच आदिवासी महिला व आर्थिक दृष्टया मागासलेल्या मुलींचे शासकीय वस्तीगृह रावेर येथे भेट देऊन यांचेशी चर्च्या केली त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तेथील गृहपाठ सौ घाटे यांनी माहिती दिली सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात,व बाहेरील कोणत्याही व्यक्तीचा त्रास असल्यास पोलिसांना कळविणे करीत फोन नम्बर दिला सोबत दक्षता कमिटीच्या महिला सुद्धा होत्या,सर्व वसतिगृहातील मुलींना भेटून भरोसा दिल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला,नमूद
वातीगृहात,पाल,धुळे,नंदुरबार,जामनेर,नीमड्या, अश्या दुर्गम भागातील पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या 35 मुली आहेत.अश्या प्रकारे जागतिक महिला दिनी उपस्थित सर्व महिलांना पुष्प गुच्छ देऊन रावेर पो स्टे येथे अभिनव उपक्रम,DYSP पिंगळे सो फैजपूर, पो नि रामदास वाकोडे,API शितलकुमार नाईक,PSI सुनील कदम,PSI वाघमारे यांचे उपस्थितीत पार पडला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा