Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ मार्च, २०२०

शाळेत नारीशक्तीचा सन्मान करीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


रावेर प्रतिनिधी:श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नारीशक्तीचा सन्मान करीत जागतिक महिला दिन महिला पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा केला. शाळा नेहमी शैक्षणिक क्षेत्रात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित असते. 

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा हेच ध्येय ठेऊन उपक्रम राबवित जातो. असाच नारीशक्तीवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम महिला दिनानिमित्त आयोजित केला.

स्वतंत्र भारतात महिलांची प्रगती, त्याचे अधिकार, त्यांचा सन्मान, आदर व्यक्त करण्यासाठी 8 मार्च रोजी संपुर्ण भारतात महिला दिवस साजरा केला जातो. 8 मार्च 1908 रोजी न्युयॉर्क मध्ये हजारो स्त्रियांनी रूट गर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. कामाचे तास, त्याठिकाणी सुरक्षितता तसेच लिंग, वर्ण, संपत्ती व शैक्षणिक पार्श्वभुमि निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री, पुरूषांना मतदानाचा हक्क मिळावा या साठी अमेरीकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा व तो पारीतही झाला.

भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस 1943 साली साजरा झाला. पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहिर केले. त्यांनतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या, बदलत्या सामाजिक, आर्थीक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूपही बदलत आहे. आज महिलांनी आपले कर्तव्य प्रत्येक क्षेत्रात सिध्द केले आहे आणि करत आहे.
          
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ आशा श्रीराम पाटील, सौ भावना प्रमोद पाटील, हिराबाई सिताराम पाटील, सौ मिनाक्षी प्रविण पासपोहे, कु. प्रियंका श्रीराम पाटील, कु. दिव्यांशू प्रमोद पाटील, शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या सौ कविता शर्मा, व्यवस्थापक गजानन महाजन, महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील यांनी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वागतगीत झाले तद्नंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले त्यांनतर भारतीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थ्यीनींचा पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. उपस्थित महिला पालकांसाठी हळदी कुंकू, बांगड्यांचा कार्यक्रम, खेळामध्ये 1 मिनीट राऊंड शो, संगीत खुर्ची, दमसेराक इ. कार्यक्रम झाले.
          
आजच्या कार्यक्रमात महिला पालकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मोनिका अनिल भिंगाणे, कु. कामिनी तायडे यांनी केले. कार्यक्रमाला सहकार्य प्राचार्या, शिक्षिका यांनी केले. तसेच व्यासपीठ सजावट कला शिक्षक समीर खराले, समशेर तडवी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध