Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ मार्च, २०२०

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांचे मानले आभार टूवीट करून दिले धन्यवाद



(संपूर्ण देश कोणत्याही संकटाचा
सामना करण्यास सज्ज )
आज संपूर्ण देशातील नागरिकांनी जगाला दाखवून दिले की आम्ही कोणत्याही प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी याच्या पाठीसी खंबीरपणे उभे आहोत 
आज जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला संपूर्ण देशवासियांनी100%  सहकार्य केले असून संध्याकाळी 5 वाजता धाळ्या व टाळ्या वाजवून फटाके फोडून
देशातील पोलीस.डाॅक्टर.नगरपालिका. महानगरपालिका. महसूल प्रशासन लोकप्रतीनिधी सेवाभावी संस्था 
यांचे अभिनंदन करून त्याचे मनोबल वाढविले आहे हे सर्व भारतात होत असताना संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे उघड्या डोळ्यांनी जग पहाता आहे की भारतातील संस्कृती अजून जिवंत आहे
धार्मिक परंपरा साधू संताचा देश
असणार्या भारतातील नागरिकांनी एकवेळ पुन्हा सिद्ध करून दिले की आम्ही कोणत्याही प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज आहो

आमच्या देशाच्या प्रमूखाचे आदेश मानतो प्रशासनाचे आदेश मानतो आमच्या देशात
पाहिजे तेवढ्या आरोग्याच्या प्रगत सूख सुविधा नसतानाही आमच्या देशातील डाक्टर तज्ञ आहेत ते या देशातील नागरीकांचा जिव सहजासहजी जावू देणार नाही.

पोलीस प्रशासन सुद्धा 
कार्यतत्पर आहे. लोकप्रतिनिधी. सेवाभावी संघटना सुद्धा कार्यतत्पर आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना
करण्यासाठी सज्ज आहे हे आज
रोजी भारताने जगाला दाखवून दिले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध