Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

कानळदा येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या ; आत्महत्येपूर्वी तयार केला नैराश्यपूर्ण ‘टीकटॉक व्हिडिओ’ !


जळगाव:प्रतिनिधी: तालुक्यातील कानळदा येथील अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. कानळदा गावालगतच असलेल्या शेतात झाडाला आोढणीने गळफास घेतला आहे. 

मुलाचे नाव अक्षय साळुंखे (उर्फ भैय्या) असून हा मुलगा १५ ते १६ वर्षाचा आहे. आत्महत्या करण्यापुर्वी या मुलाने टिकटाॅक चा व्हिडिओ बनवला होता व त्या व्हिडिओ मध्ये तो मुलगा कुठल्यातरी नैराश्यात दिसत आहे. 

ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची दबक्या आवाजात चर्चा गावात सुरू आहे. या घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध