Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
मतभेद न होता सर्वांना सोबत घेवुन पक्षाचे काम व्हावे: आ. काशीराम पावरा तालुक्यात व शहरात पक्ष अधिक मजबुत होण्यासाठी अध्यक्षांनी जोमात काम करावे: बबनराव चौधरी
मतभेद न होता सर्वांना सोबत घेवुन पक्षाचे काम व्हावे: आ. काशीराम पावरा तालुक्यात व शहरात पक्ष अधिक मजबुत होण्यासाठी अध्यक्षांनी जोमात काम करावे: बबनराव चौधरी
शिरपुर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपसात मतभेद न ठेवता एकमेकांनमध्ये आपुलकेचे व मधुर संबंध ठेवुन सर्वांच सोबत घेवुन पक्षाचे काम करावे. तसेच राज्यात पक्षाची सत्ता नसतांनाही तालुक्यात विविध विकास कामासाठी माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचा मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात निधी आण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. काशीराम पावरा यांनी सांगीतले.
शिरपूर शहरात व तालुक्यात भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम व मजबुत होण्यासाठी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी जोमात काम करावे व ज्यांना अध्यक्ष होण्याची संधी मिळाली नाही असे सर्वांना पक्ष काहीना काही जबाबदारी देईल तसेच पक्ष कार्यकर्ता व माजी पदाधिकारी हे बीद्र आपल्यासाठी खुपच मोठे आहे तसेच नुकत्याच राज्याचा अर्थसंकल्पात मतदार संघातील विविध कामासाठी कोठ्यावधी रुपये निधी मंजुर करुन घेतल्या बद्दल त्यांचेही अभिनंदन भाजपा धुळे मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले.
शिरपूर भाजपा तालुकाध्यक्षपदी किशोर माळी व शहराध्यक्षपदी हेमंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल येथील पक्ष कार्यालयात आ. काशीराम पावरा व बबनराव चौधरी यांचा हस्ते दोघे अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ. काशीराम पावरा व बबनराव चौधरी बोलत होते.
कार्यकर्त्यांनी पक्ष पदासाठी अपेक्षा व्यक्त करावी व न मिळाल्यास आशावादी राहावे निराश होवु नये असे आवाहान भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष किशोर माळी व शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी पक्ष अधिक व सक्षम करण्यासाठी सर्वांच सोबत घेवुन काम करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, नरेश पवार, मुकेश पाटील, अधिकार माळी, पिंटु माळी, मोहन माळी, रविंद्र माळी, नितीन माळी, डाॅ. मनोज महाजन, श्रीकृष्ण शर्मा, राजुलाल मारवाडी, युवराज माळी, गणेश चौधरी, राधेश्याम भोई, मुबीन शेख, अरमान मिस्तरी, रफीक तेली, जाकिर तेली, रविंद्र सोनार, गिरीश सनेर, हेमराज राजपुत, सोमा धनगर, हिरालाल कोळी, गणेश भावसार, विनायक कोळी, जगन्नाथ पाटील, रवि माळी, गणेश माळी, सुभाष राजपुत, राज सिसोदिया, किशोर चव्हाण, संदीप माळी, भुपेश परदेशी, दिपक पवार, विजय सुर्यवंशी, बापु लोहार, अविनाश शिंपी, रविंद्र भोई, टिलु बोरसे, राहुल कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा