Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

दोंडाईचातील बँकांची एटीएम सेवा सुरू असावी




प्रतिनिधी: दोंडाईचातील बँकांची एटीएम सेवा सुरू असावी-- संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांमध्ये बँकेची एटीएम सेवा देखील येत असल्यामुळे ही सेवा निरंतर सुरू असायला हवी असे असताना मात्र दोंडाईचा शहरातील स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, देना बँक आदी बँकांचे एटीएम सेवा बंद असल्यामुळे दोंडाईचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे 

एटीएम सेवा बंद असल्यामुळे सदर बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. दोंडाईचा शहरात काही बँकांचे एटीएम सेवा गतकाळात चोरांनी नादुरुस्त केले होते तेव्हापासून एटीएम सेवा बंद आहे, तर काही बँकांमध्ये इतर कारणास्तव एटीएम सेवा बंद आहे 

अशा परिस्थितीत  नागरिकांना एटीएमच्या जलद सेवेपासून वंचित राहावे लागत आहे अशा बँकांचे व्यवस्थापकांनी तेथील एटीएम सेवा सुरू करून सर्वसामान्य नागरिकांची, बँक ग्राहकांची गैरसोय दूर करावी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध