Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ मार्च, २०२०

प्रहार जनशक्ती पक्षाचे पंकज पाटील यांच्या मागणीनुसार मंगळग्रह मंदिर भाविकांसाठी बंद


अमळनेर   i प्रतिनिधी – शिवाजी पारधी  : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर देशातील व महाराष्ट्रातील बरेच मंदिरे व संस्थाने दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत व करण्यात येत आहेत. अमळनेर तालुक्यातील अतिप्राचीन मंगळग्रह मंदिर मात्र सुरूच होते .१७ मार्च रोजी मुंबई,पुणे ,नाशिक व इतर मोठ्या शहरातील लोक त्याठिकाणी येत होती हे अमळनेर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी पाहिले व तालुक्याचे सुजाण व दक्ष नागरिक म्हणून त्यांनी  तहसिलदार ,उपविभागीय अधिकारी  अमळनेर ,जिल्हाधिकारी जळगांव,पक्षप्रमुख राज्यमंत्री बच्चू कडू  व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे  मंदिर बंद करण्याची मागणी ऑनलाइन तक्रार करून ठीक १७ मार्च रोजी रात्री ९.३३ मिनिटांनी केली होती .

अमळनेरच्या प्रांत सीमा अहिरे व तहसिलदार  मिलिंद वाघ यांनी तक्रारीचे गांभीर्य बघता मंगळग्रह मंदिर हे शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत भक्त भाविकांसाठी आज बंद केले आहे. अमळनेर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पंकज पाटील हे नेहमी जनतेच्या हितासाठी समाज उपयोगी निर्णय घेत असतात व ते प्रशासनाच्या लक्षात आणून देतात.

  दहिवद गावांत त्यांनी  हजारो झाडे जगवली असून त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले आहे .जळगांव जिल्ह्यातील रेशन भ्रष्ट्राचार करणाऱ्या बारा रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याकामी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या या कामगिरीसाठी  अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव  यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.अमळनेरच्या इतिहासात अपंगासाठी नगरपालिकेला अपंग निधी खर्च करण्यास भाग पाडणारे देखील तेच आहेत . त्यांच्या या समाज उपयोगी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

अमळनेर तहसिलदार व प्रांत यांनी मंगळग्रह मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा तात्काळ घेतलेला निर्णय परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेवून घेतलेला  असून त्यांच्या या कर्तव्यदक्ष निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे . अमळनेर तहसिलदार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे पंकज पाटील  यांनी लोकहिताची ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली म्हुणन आभार मानले आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध