Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मार्च, २०२०

कोलकाता (प.बंगाल ) येथे झाली निवड अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीयध्यक्षपदी : कृष्णकुमार कनोजिया


शिरपुर (प्रतिनिधी) अखिल भारतीय धोबी महासंघाची सर्वसाधारण सभा प्रतिज्ञा कम्युनिटी हाॅल, म्युनिसिपल काॅपोरेशन कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी ज्युबली सत्यनारायण (आंध प्रदेश) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली या सर्वसाधारण सभेत समाजाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्यात आली यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीयध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया (महाराष्ट्र) यांची निवड झाली. 

राष्ट्रीयध्यक्षपदासाठी देशातुन विविध राज्यातील पाच उमेदवार उभे होते त्यात महाराष्ट्रातुन एकनाथराव बोरसे धुळे, विजय भोसले सोलापुर, गुजरातमधून भरत दोडिया व तामिळनाडुचे दुराई आण्णा स्वामी उमेदवार होते तर निवडणूकीत अखिल भारतीय धोबी महासंघ (ABDM) राष्ट्रीयध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया यांनी बाजी मारली निवडणुक आधीच एकनाथराव बोरसे यांनी कृष्णकुमार कनोजिया यांना पाठींबा दिला होता.
 
अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय सर्व साधारण सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय कार्यध्यक्ष पारसनाथ रजक (प. बंगाल) यांनी परिश्रम घेतले तर राष्ट्रीय सचिव, समाजभुषण राजेंद्रशेठ आहेर (महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणुक शांतेत पार पडली. कृष्णकुमार कनोजिया यांनी पंधरा वर्ष महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन काम केले असुन गेल्या पाच वर्षपासुन अखिल भारतीय धोबी महासंघाचे (ABDM) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कार्यरत होते यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघाच्या राष्ट्रीय सर्वसाधरण सभेला आ. श्रीमती. प्रोतिबा रजक (पश्चिम बंगाल) यांनी उपस्थित कार्यर्त्यांना मार्गदर्शन केले.

 या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेला धुळे जिल्हातुन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे सह राष्ट्रीय ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप शिंदे, महिला मंडळ राष्ट्रीय सदस्या सौ. रत्नाताई शिंदे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, परिट (धोबी) सेवा मंडळ तंटामुक्ती समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रा. एस. टी. ठाकरे यांनी सहभाग घेतला होता अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीयध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध