Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
लोहगाव येथे कोरोनाबाबत जनजागृती अभियान व मोफत मास्कचे वाटप
लोहगाव प्रतिनिधी कोरोना महामारीने जगभरात अक्षरशः थैमान घातले आहे आपल्या देशात सुद्धा संख्या वाढत चालली असून दुर्दैवाने राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत, केंद्र व राज्य शासनाने निर्णय घेऊन 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे.
प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण लोकांमध्ये अफ़वा असल्याने लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. कोरोना बाबत नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागात जनजागृतीची गरज लक्षात घेता आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था ने 19 मार्च रोजी नळदुर्ग शहरातून जनजागृती अभियान सुरू केले आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे मॅडम यांनी जिल्ह्यात मास्कचे वापर सक्तीचे केले आहे त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी मास्क चे वापर केलेच पाहिजे यासाठी आरंभच्या वतीने लोहगाव येथे गावचे उपसरपंच प्रशांत देशमुख, डॉ. आनंद काटकर, कोरोना सहाय्यता कक्षाचे डी. एस. वाघमारे, अतुल पाटील यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.
आरंभच्या वतीने सुरू असलेल्या जनजागृती अभियाना अंतर्गत नळदुर्ग, होर्टी, चिकुंद्रा, बाभळगाव नंतर काल लोहगाव येथे मोफत मास्कचे वाटप व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून लोहगावकरांना आवाहन करण्यात आले की नागरिकांनी कोरोनाला घाबरुन न जाता कुठल्याही अफवांना बळी पडू नये, वारंवार हात धूत रहा, आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचे वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, कोरोबाधित किंवा इतर ठिकाणावरून गावचा नागरिक गावात परत येत असेल तर त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करूनच गावात यावे तसेच कोरोना चे प्राथमिक लक्षण आढळल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी किंवा कोरोना सहाय्यता कक्षाला संपर्क करावे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, आकाश मेंडके, चेतन जाधव आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा