Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
जळगावमधील औद्योगिक वसाहतीतील अयोध्या नगरमध्ये महिला रेशन दुकानदाराची शिरजोरी
जळगाव प्रतिनिधी: जळगांव येथील औदयोगिक वसाहत 2 अयोध्या नगर मधील रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार सुरू असून हे रेशन दुकाळ महिला चालवीत आहे. हे रेशन दुकान नेहमीच बंद असते. वेळेच्या फलका नुसार रेशन दुकान कधीच उघडत नाही.
विशेषतः प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना अपमानित करून धान्य न देता ‘रेशन धान्य आलं नाही’, ‘धान्य पुरवठा कमी मिळाला’, ‘मी तुमच्या रेशन कार्ड वरील धान्य उचलले नाही’, ‘मी घरगुती कामामुळे रेशन दुकान उघडू शकत नाही’, अश्या विविध प्रकारे उत्तर देऊन रेशन कार्ड धारकांना घरी पाठविण्यात येत असते.हा त्रास नेहमीचा असल्या कारणाने काही नागरिकांनी रेशन घेणे टाळले असून तर काहींनी रेशन दुकान बदलविले आहे.
महिला रेशन दुकानदाराच्या या शिरजोरीला आता पर्यंत तिच्या वर एकदाही कारवाही केली नाही. असा कोणता मोठा हस्तक तिच्या पाठी मागे आहे ? असा प्रश्न परिसरातील जनतेला पडलेला आहे.सदर महिला दुकानदार नेहमी ‘माझं कोणी काही करू शकत नाही,तुम्हाला जिथे जायायचे आहे तिथे जा’, अश्या शिरजोरी भाषेत बोलत असते. यामुळे परिसरातील संतप्त रेशन कार्ड धारकांची सदर महिला दुकानदारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व आम्हाला नियमित रेशन धान्य मिळावे अशी मागणी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा