Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
सोनारी येथील काळभैरवनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द
सोनारी प्रतिनिधी दि.17 ,आज आपल्या देशावरती कोरोनाचे मोठे संकट आहे. देशाच्या मानाने महाराष्ट्र राज्याची परिस्थिती तर अत्यंत बिकटआहे. संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.सर्व यात्रा, उत्सव,आठवडी बाजार शासनाने रद्द केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.यामुळे अखंड चालणारी 500वर्षापूर्वीची काळभैरवनाथ रथोत्सव यात्राची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.
परंडा तालुक्यातील सोनारी येथे महाराष्ट्रासह,कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून लाखो लोक दर्शनासाठी येतात.दरवर्षी श्री क्षेत्र सोनारी येथे चैत्र वद्य अष्टमी पासून ते त्रयोदशीपर्यंत मोठी यात्रा भरते. सोनारी येथील भैरवनाथाचे मंदिर फार पुरातन व जागृत असुन हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम आहे.
दि:१८,१९व २० होणारी श्री काळभैरवनाथांचा यावर्षीचा याञा उत्सव रद्द आपल्या देशावरती सध्या कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर पसरलेले सावट यंदाच्या श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवाच्या याञेवरती सुद्धा येऊन ठेपले आहे.
श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवाची दिनांक १८,१९व २० होणारी याञा शासनाच्या आदेशानुसार व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या निर्णयानुसार ग्रामस्थांच्या व भाविक भक्तांच्या आरोग्याच्या काळजीस्वत यावर्षीचा याञा उत्सव रद्द करण्याचे ठरविले आहे,
मंदिरात फक्त धार्मिक विधी पूजा होणार आहे.दर्शनासाठी कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे अनावश्यक गर्दी करू नये तरी याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी,व आपल्या घरीच सुरक्षित रहावे.अशी माहिती संजय महाराज (मुख्य पुजारी भैरवनाथ देवस्थान सोनारी) यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा