Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई समाजाचे व्यवसाय का बंद पडत आहेत? यावर चिंतनमनन व कार्यवाही व्हावी....श्री अशोक भोई,एरंडोल
भोई समाजाचे व्यवसाय का बंद पडत आहेत? यावर चिंतनमनन व कार्यवाही व्हावी....श्री अशोक भोई,एरंडोल
एरंडोल प्रतिनिधी: भोई समाजातील व्यवसाय का बंद पडत आहेत?? हा संपूर्ण समाजाला विचार करण्याचाच भाग ठरत आहे. भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय नदी/नाल्या व ओढा येथे मच्छिमारी करणे हा होता.
त्याला जोडव्यवसाय म्हणून त्याच ठिकाणी डांगरवाडी लावणे त्या माध्यमातून उपजीविका भागविणे. परंतु कालांतराने शासनाने प्रत्येक नदीवर अंतर/अंतरावर धरण बांधले परंतु त्यावेळेस समाजाच्या कोणत्याच नेत्यानी या समाजाचे भविष्यात पोटभरण्याचे (उपजीविकेचे) काय होईल?? हा प्रश्न शासनकडे मांडला नाही हा त्यावेळेचाअज्ञानपणाच म्हणावे लागेल किंवा समाजाचे दुर्लक्ष झाले असे ही म्हणावे लागेल त्यामुळे डांगरवाडी लागवड या व्यवसायावर अवलंबून असलेली अनेक कुटुंब ही बेकारीच्या उंबरठ्यावर आल्याचे आज दिसून येत आहेत. नदीतील डांगरवाडी गेल्यामुळे हक्काची शेती गेली
आज कसरतची(उक्तीने) पैसे देवून केलेली शेतजमिनीवर डांगरवाडीची लागवड करून सुद्धा निर्सगाच्या लहरीपणामूळे आश्वासित उत्त्पन्न येईलच याची खात्री नाही. तसेच नदी/नाल्यावरील धरण व तलाव शासनाने खाजगी ठेक्याने दिल्यामुळे मासेमारीसाठी ठेकेदाराच्या अनेक अटी शर्ती किंवा विरोध असतातच म्हणून की काय आपले बांधव कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अल्प मजुरीने मासेमारी करतात. असे हक्काचे व अल्पभांडवलाचे साधनाची व्यवसाय बुडाली.
त्या कारण भोईसमाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. समाजाची आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलांना चांगल्या शिक्षणासाठी लागणारे भरमसाठ डोनेशन व अवाजवी फी यामुळे काहींनी अर्ध्यावरच शिक्षण सोडून दिले आहे व आपल्या पारंपरिक व्यवसायत स्वतःला गुंतून घेतले. कारण इतर व्यवसायासाठी लागणारे भांडवल राष्ट्रीयीकृत बँक देत नाहीत. इतर पतसंस्था आपला पारंपरिक व्यवसायास कर्ज देत नाही.
तसेच चणे/फुटाणे/दाळ्या/मुरमुरे यांचे उत्पादन यंत्रसामुग्रीची निर्मिती होत असल्याने व व्यवसायासाठी बंधन नसल्याने कोणी ही तयार माल घेऊन विक्री करतात. या अनेक कारणामुळेच भोई समाजाचे पारंपरिक व्यवसाय बंद पडत आहेत. भोईसमाजाला पुन्हा व्यवसायात पुनर्जीवित करण्यासाठी राज्यसरकारने स्वतंत्र असे आर्थिक पुरवठा करणारे राज्यस्तरिय भोईसमाज प्रादेशिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून फक्त भोईसमाजातील व्यवसाय करण्याऱ्या बांधवाना विनातारण अर्थ सहाय्य करावे. त्याकामी राज्यातील समाजसंघटन यांनी पुढाकार घ्यावा आणि सरकारी दरबारी आपली मांगणी एकतेतुन करावी.
तरच आपला समाज बांधवांची परिस्थिती बदल होऊन येणाऱ्या पिढीला फायदा होईल. यासाठीच समाजबांधवांनी एकजूठ दाखवून प्रयत्न करावे हीच विनंती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा