Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
शासकीय इतमामात शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांना श्रद्धांजली
"जळगांव मतदार संघातील सर्व जनता शहिद चंद्रकांत भाकरे यांच्या कुटुंबीयांसोबत" - डॉ.संजय कुटे, आमदार जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ
संग्रामपूर : जम्मू काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढतांना केंदीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान शहीद झाले , ज्यामध्ये एक जवान महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्याचा आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ३८ वर्षीय चंद्रकांत भगवंतराव भाकरे हे जवान आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असतांना आतंकवाद्यांच्या चकमकीत शहिद झाल्याची घटना १८ एप्रिलरोजी संध्याकाळी घडली. ही माहिती कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली, या जवानांचे पार्थिव नागपर पर्यंत हेलिकॉप्टर ने आले त्याठिकाणहुन ॲम्बुलन्सने त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे आज सकाळी ६:३० वाजता आल्यावर संपूर्ण गावातून शहिद चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवाचे दर्शनासाठी अंत्ययात्रा काढण्यात आली.
त्या निमित्त गावात युवकांनी संपूर्ण गाव स्वच्छ केले आहे. प्रत्येकाच्या मनात शहीद चंद्रकांत यांच्याबद्दल देशाभिमान यावेळी दिसून आला.
मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तात गावातील भूषण गजानन रोठे यांच्या शेतात शहीद जवानाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय इतमामात अंतिम संस्कारची तयारी पातुर्डा ग्रामपंचायत व प्रशासन च्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.सोशल डिस्टिंग नियम पाळत ,तोंडावर मास्क,वेळोवेळी सॅनिटाइझर वापर, सर्वत्र जंतुनाशक फवारणी करण्यात आली.तसेच शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्याघरी गावातील,नागरिक,महिला,पुरुष,नातेवाईक हे सोशल डिस्टिंग, हातावर सॅनिटाइझर, तोंडाला मास्क लावून भेटायला येत आहे.असे कोरोना पार्श्वभूमीवर ग्रा.प.पातुर्डा व नागरिकांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे.
बाईट- आमदार डॉ संजय कुटे, जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा