Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

जेष्ठसमाजसेवक यांच्या बरोबरच्या समन्वयातुन समाज एकीकरणास सुगीचे दिवस आणु या... श्री अर्जुनभोई



राज्यात अनेक सामाजिक कार्यातुन समाजघटक हा समाजसेवेच्या जाणिवेतून आपले योगदान देतांना दिसतो आहे. बदलापुरचे आमचे बाबा, बदलापुर शहराचे माजीनगराध्यक्ष, कोंकण किनारपट्टीचा भोईराजा अर्थात मा अनंतसेठ सपकाळ साहेब यांचे कै गोपीनाथजी मुंढेसाहेब, विद्यमान विधानसभा अध्यक्ष मा नानाभाऊ पटोलेसाहेब यांच्या बरोबर सामाजिक मुद्दावर अनेकदा बैठका घेतल्याचे आम्ही पाहीले आहे आणि मुंढे साहेबांसोबत तर त्याचे चांगले सख्य होते हे तर जगजाहीर आहे. 

बाबा नेहमी म्हणायचे, महाराष्ट्रात जेष्ठसमाजसेवक मंडळींच्या समाजसेवेच्या अनुभवातून, त्यांच्या आशीर्वादातुन नविन महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो. आजपर्यंत तरी समाजातील अनेक जेष्ठमंडळींनी समाजसेवेसाठी आपला पैसा, वेळ, स्वास्थ्य, विचार, समाजाप्रती समाजप्रबोधन हे सर्व काही समाजसेवेच्या सेवेपोटीं खर्च केली आहे. 

काहींनी समाजमेळावे, सामाजिक संवादवार्ता, आंदोलने गोलमेज परिषदा, हक्कमोर्चे, सामाजिक चिंतन-मनन वर बैठका घेतल्या आहेत आणि ते आजही घेत ही आहेत.

रायगड, मुंबई पालघर ठाणे या विभागातुन जेव्हा शिरपूर-धुळे परिसरात सि एम भोई, गुलाब भोई, भाईदास मोरे, दंगल भोई, सुभाष भोई, यंशवत निकवाडे, संतोष भोई, हिंम्मत सोनवणे, रविंद्र सोनवणे, भोजराज ढोले, दीलीप ढोले, राजेंद्र वाडीले या शिरपूर टीमशी जेव्हा सपकाळ साहेबांची समाजएकीकरणासाठी जवळीक करुन देण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अनेकवेळा खान्देशातील शिरपूर येथे झालेल्या समाज मेळाव्यात आम्ही ही बाबा बरोबर सहभागी झालो होतो तसेच आमचे मित्र नरेशउखंडे बदलापुरातुनच महाराष्ट्राला परिचित झाले. 

धुळे येथील आमचे जावाईबापु गणेशजी मोरे, तावडेसर, फुलपगारेसाहेब, आमचे मित्र भिलेष खेडकर, डाँ मोरेजी, आमचे गुरुजी अे के भोईसाहेब, भटक्या जमातीवर कार्यरत असणारे सुपडुजी खेडकर. जळगांव विभागात आमचे गुरूजी एसए भोईसर त्यांचा आम्ही सदैव ऋणी आहोत गुरूजीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी होता आहे आणि राहणार... अकोला येथील केवट बांधव दशरथजी केवट साहेब, राजांरामजी म्हात्रे, नांदु-यातील बावणेजी, यवतमाळ जिल्ह्यातील राहुलजी हरसुले आणि त्यांची यवतमाळ स्थानिक टीम, 

अमरावती जिल्ह्यातील आमचे गुरुजी वासुदेवरावजी सुरजुसे त्यांच्या कडूनही आम्ही बरेच काही शिकलो शिकत आहोत, नान्हेसाहेब, कै प्रफुल्लजी पाटील-भोई ज्यांच्या सह मातोश्रीवर आम्ही भोई भगवा घेऊन गेलो, गडचिरोली विभागातून मंचालवार गुरुजी, चंद्रपुरातुन बंडुजी हजारे, दुधपचारेसर, वयोवृध्द माजी न्यायमुर्ती चंद्रलालजी मेत्रामजी जे बदलापुरात अनेक वेळा आमच्या बाबांकडे येत त्यांची आल्यानंतरची संपुर्ण जिम्मेदारी ही आमच्यावरच असायची. भंडारा जिल्हयातील आमचे आदरणीय गुरुजी सदाशिवरावजी वलथरे साहेब, नागपुरात भोईगौरवचे संपादक सीएम लोणारेजी, सुखदेवजी मेश्राम, प्रभाकरजी मांढरे, विदर्भ मच्छीमार संघाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय फिशकाँफ फेडरेशन नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष... ज्यांच्यासोबत आम्ही पुर्णमहाराष्ट्र नाही तर इतर राज्यातुनही काही शिकलो जसे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, तमिलनाडु, ओडीसा इत्यादी राज्यातही गेलो, बाहेरच्या दोन देशात जाण्यासाठीची संधी ही मिळाली पण कार्यलयीन परवानगी नसल्याने बाहेर जाता आले नाही. त्यांच्यासोबत मंत्रालयिन पातळी तसेच महाराष्ट्र पातळीवरील सामाजिक, सहकार, राजकिय, पञकारीता आणि काही बाबतीत शैक्षणिक इत्यादी कार्याच्या निमिताने आम्हाला समाज सेवेच्यास्तरावर पदरमोड करुन फिरता आले आणि भरपूर प्रमाणात काही तरी बाबी ह्या शिकता आल्या शिकत आहोत, शितकही राहणार... मराठवाड्यातील औरंगाबाद येथील आमचे आदरणीय तसेच प्रेरणास्रोत गजानन दादा साटोटे त्यांच्या टीम मधील श्रीनाथजी, आमचे नातलग तुकारामजी वानखेडे, विनोदजी नेमाडे, शंकररावजी वानखेडे, दादाराव आळणे, गंदलवाडगुरुजी, न्यायमुर्ती गोखले साहेब, केळोदे कुटुंबातील सदस्यगण, संतोषजीईच्छे. नांदेड जिल्ह्यात शंकरराव खंडागळे, आमचे मित्र नानासाहेब लकारे, कंदार लोहा येथील समाजघटक आणि त्यांच्या आदरतिथ्यास आम्ही आजही विसरलो नाहीत. माळाकोळीचे पंदीलवाड, बिलोली, उमरी, नांदेड शहरटीम उनकेश्वर, माहुरगड किनवट येथील समाजघटक. लातुरमध्ये खैरमोडे कुटुंबातील सदस्यगण, अनंतवाळ कुटुंब, बीड जिल्ह्यातील केवट समाजबांधव, विचारवंत, उत्तम लेखक प्रा रामनाथजी वाढेसर, बुलढाण्यातील केवटबांधव दिलिपजी परसने आजही यांच्यासह आम्ही कर्मवीर दादा इदाते साहेबांसोबत विमुक्त घुमंतु जनजाती विकास परिषदेवर महाराष्ट्र राज्यातुन भोई आणि त्याच्या अंकित जमाती यांचा पक्ष समोर ठेवत आहोत. जालन्यातील राजेंद्रतमखाने, सोलापुरात माजी कलेक्टर मवारेसाहेब, अक्कलकोटचे सिध्देबांधव. उस्मानाबाद जिल्ह्यातील विशालजी डुकरेसर ज्यांच्या सासवाडीला तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील बोधन येथेही जाण्याचा प्रसंग आला आणि त्यांचे सासरेबुवा यांना ही भेटता आले. कोल्हापूरातील शिर्के, नलावडे, काटकर कुटुंबीय, प्राध्यापक काटकरसाहेब यांच्याकडून ही खुप काही शिकता आले. फलटनचे आमचें साडु इंजिनिअर- काँन्ट्राक्टर गणेशजीभोई, प्रशांतजी साटोटे. पुण्यातील डॉ मिलिंदजी भोई ज्यांच्या कार्यातून बरेच शिकत आहोत, शोभाताई भोकरे त्यांची टीम, कारळेताई त्यांची टीम, नगरसेवक नगरसेविका तिकोने बंधुभगिनी, नंदुकुमारजी नगरे, सीतारामजीभैय्या नगरे, अँडव्हो. श्रीकांतजी पाटील-भो़ई, युवराज लांबोळे, मल्लाव-भोईबांधव ज्यात सुभाषजी मल्लाव, दादाजी मल्लाव, ताराचंद परदेशी, मनिष काची, भारतीय सैनिक दलातील मोरेजी, आमचे भोई गौरवचे गवळीजी. नगरमध्ये कमलेशजी लांडगे, मनोजकांबळे, अभिजितसर, देवाहुशार त्यांची संपुर्णटीम. डॉ तुंबारे, जयसिंगजी गहरे, अशोकजी लकारिया, अर्जुनमोरे, अशोक बंशीलाल मोरे, विजयमोरे, सदाशिव साटोटे कोपरगांव येथील संपुर्ण भोई, कहार समाज टीम. मुंबई विभागात सुनिलजी वाडीलेसाो भोई बहाळकर, सौ अल्काताई घाटे, सौ यशश्रीताई पाटील-भोई, आमचे सासरेबुवा विचारवंत लेखक देविदासजी मोरे, विकासजी मनुकर, रमेशजी तारु, कर्जावकर- जाधव- चव्हाण- वंजारी- सुरजुसे कुटुंबीय, आमचे नलावडेबापु, डॉ भोई, संतोषजी मोरे, अँडव्हो. राजाराम गौडजी, सुजितगौड, रामोळेसाहेब, महाडीकजी. वाड्यातुन रविंद्रजीमोरे पालघर विभागात शिवदे सोनवणे, वाडीले कुटुंबातील सदस्यगण. भिवंडीचे सामाजिक, राजकीयस्तरावर असलेले आणि कोळी-भोई एकता विचारमंचच्या माध्यमातून आमदार, शिवसेना उपनेते, कोळीनेते मा अनंतजी तरेसाहेब यांच्याबरोबर कार्यरत, भोई कोळीचा बुलंद आवाज, गरीबांचा दाता आमचे बांधव मदनजीभोई. नाशिक विभागात डॉ भोकरे, विजयजी भामरे, गणेशजी सपकाळ, आमचे ब्रोकर तथा बांधकाम व्यावसायिक जावाई सुभाषजी तमखाने त्यांचे बंधु, अशोकजी सोपे, दुसरे जावाई भागवतजी ढोले, राजकारणात आम्ही आशेचा किरण समजतो असे नंदेशजी ढोले, श्यामकांतजी बोरदे, आमचे मित्र ज्ञानेश्वरजी खैरमोडे, शशिकांत झिटे तुषारजी साटोटे त्यांच्या सोबत संपूर्ण नाशिकटीम... इत्यादी इत्यादी अजूनही बरेच जेष्ठ तसेच समवयस्क, मि़त्र आणि अनुज असे समाजघटक आहेत अशांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यात उभे राहून, समाजस्तरावर आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या भावनेतुन कार्यरत होतांना सामाजिक आनंद मिळत आहे आणि काही तरी देण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. 

शेवटी एक ईच्छा ही व्यक्त करत आहोत की, जेष्ठ समाजसेवक आणि इतर समाजवर्ग यांच्यात ठीक ठिकाणी समन्वय घेऊन आजच्या महाराष्ट्रातील आपल्या समाजास सुगीचे दिवस येण्यास सहाय्यभुत ठरु या, कारण जेष्ठ हे आमचे आदर्शच आहेत आणि त्यांचा मानसन्मान करणं हे आम्ही आमची हिंदू संस्कृती समजतो असे मला तरी वाटते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध