Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

केळी उत्पादकांना चांगल्या भावाची लागली आस चिनावल च्या शेतकऱ्यास मिळाला ८०० रु.चा भाव



प्रतिनिधी रावेर रावेर तालुक्यातील
चिनावल येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रोगा च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व लाॅकडावून आहे या मुळे रावेर यावल सह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनवर अस्मानी व सुलतानी सकटासह केळी मालाची मागणी घटली होती तर थोडे फार व्यापारी केळी माल खरेदी करीत होते मात्र अत्यंत कमी भावाने खरेदी करीत होते या मुळे केळी उत्पादकांना मध्ये संतापाची लाट उसळली होती 

मात्र गेल्या २ ते ३ दिवसापासून केळी मालाची मागणी वाढल्याने व येणाऱ्या रमजानच्या पार्श्वभूमीवर ही केळी ची मागणी होवू  लागल्या ने तसेच आखाती देशात ही निर्यात होत असल्याने सद्यस्थितीत भाव ही टपटप्याने वाढत आहे या मुळे केळी उत्पादकांन मध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे 

आज दिनांक २२ रोजी ७८५ रु भाव आहे मात्र काही ठिकाणी जादा भावाने ही मागणी होताना दिसत आहे आज चिनावल येथील केळी उत्पादक टेनू नेहते यांच्या केळी  ला ८०० रुपये भाव मिळाला असाच भाव या पुढे ही मिळत राहावा अशी आस उत्पादकांना लागली आहे तर या पुढे केळी ला बऱ्या पैकी भाव मिळेल असा अंदाज ही केळी खरेदी विक्री क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे एकंदरीत थोडे थोडे का होईना केळी च्या भावात सुधारणा होत असल्याने उत्पादकांना मात्र चांगले भाव मिळण्याची आस लागली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध