Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
खान्देशकरांनो….जरा धीरानं घ्या ! जळगावात कोरोनाचे सहा रुग्ण, नंदुरबार जिल्ह्यात पहिला बळी तर धुळे जिल्हा ‘रेड झोन’मध्ये
खान्देशकरांनो….जरा धीरानं घ्या ! जळगावात कोरोनाचे सहा रुग्ण, नंदुरबार जिल्ह्यात पहिला बळी तर धुळे जिल्हा ‘रेड झोन’मध्ये
जळगाव प्रतिनिधी: जळगाव येथील 73 वर्षीय पुरूषाचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर यैथील 73 वर्षीय पुरूष कोरोना पाॅझिटिव्ह निघाला असून जळगाव जिल्ह्यात कोरोना पॅझिटिव ची संख्या आता 6 वर पोहोचली आहे.यामुळे जिल्हावासीयांची चिंता आता अधिक वाढली आहे. अमळनेरातच तब्बल 4 कोरोना पॅझिटिव्ह आढळले असून त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिघांनवर उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात काल रात्री कोरोनाचा पहिला बळी गेला असून शहादा तालुक्यातील एका युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर धुळे जिल्ह्यातही काल नवीन सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्याचा आकडा हा 15 वर गेला आहे.एकट्या धुळे शहरात यापैकी 12 रुग्ण आहेत.यामुळे धुळे जिल्हाही आता रेड झोनमध्ये आला आहे.एकंदरीत खान्देशात कोरोनाने आता जोर पकडला असून तमाम खान्देशकरांनी आता कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.कारण कोरोना खान्देशात झपाट्याने वाटचाल करण्याची चिन्हे दिसत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा