Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
ब्रेकिंग न्यूज शिंदखेडा तालुक्यात आणखी एक कोरोना रुग्ण!!
शिंदखेडा( प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यात बामणे गावा पाठोपाठ या गावातही आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने आज दुपारी चार वाजेपासून डांगुर्णे आणि चिमठावळ ही गावे 14 दिवसासाठी सील करण्यात आले
आहेत या गावांना कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून शिंदखेडा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी प्रत्यक्षात गावांना भेटी देऊन गावे कंटेनमेंट झोन व बफर झोनमधील जाहीर करून गावकऱ्यांना चौदा दिवस बाहेर न निघण्याच्या इशारा दिला आहे डांगुर्णे परिसरातील पाच किलोमीटर परिसर देखील बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून परिसरातील दराणे, रुदाने, व सोडले ही गावे बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आली
आहेत दरम्यान उद्यापासूनच डांगुर्णे व चिमठावळ या गावांना संबंधित गावाचे ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील व ग्राम विकास अधिकारी यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल काळातील वैद्यकीय दवाखाने व मेडिकल सोडून इतर सर्व व्यवहार बंद करण्यात येत असल्याचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी जाहीर केले आहे गावातील प्रत्येक नागरिकांची उद्यापासून माहिती घेण्यात येऊन वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना पुढील उपचारासाठी निर्णय घेण्यात येईल असे आवाहनही तहसीलदारांनी केले
आहे दरम्यान पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी गटविकास अधिकारी सुरेश शिव दे तलाठी श्री पवार चिमठाणे आऊट पोस्टचे पोलीस अधिकारी व प्रशासनाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भूषण मोरे तालुका आरोग्य विभागाचे वीरेंद्र चव्हाण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा