Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
शिरपुर या सुवर्णनगरीत नुकतेच शिरपूर सर्च नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू झाले आहे.
शिरपुर या सुवर्णनगरीत नुकतेच शिरपूर सर्च नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू झाले आहे. या वेबसाईट (पोर्टल) चा उद्देश म्हणजे शिरपूरमधील सर्व प्रकारची माहिती एका जागी उपलब्ध करून देणे. यामध्ये शिरपूरमधील व्यवसाय,व्यावसायिक, सुविधा पुरवठा करणारे,संस्था (खाजगी आणि सरकारी), हॉस्पिटल्स,कार्यालये, देवस्थाने, मनोरंजनाची ठिकाणे सोबत इतर अनेक गोष्टींचा समावेश असेल.
शिरपूरमधील हा पहिला आणि एकमेव असा उपक्रम आहे. यात कुणीही स्वत:च्या व्यवसायाची (Business किंवा Service Provider) माहिती विनामूल्य जोडू शकतं. आपले छोटे दुकान असो वा शॉपिंग मॉल, होलसेलर असो व रिटेलर किंवा आपण घरपोच सुविधा देत असो, आपण येथे आपली नोंदणी करू शकता. येथे आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.
तसेच आपण विकत असलेले प्रॉडक्ट्स किंवा देत असलेल्या सर्विसेस याबद्दल माहिती देऊ शकता जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायवृद्धीत मदत होऊ शकेल. तसेच येथे व्यापार सोडून इतरही प्रकारची माहिती संकलित करण्यात येते जसे की वेगवेगळे कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळे, देवस्थाने, विविध घडामोडी, इत्यादि.
या वेबसाईट वरुन आपण शिरपूरमधील विविध व्यवसायांची माहिती विनामूल्य मिळवू शकता अगदी फोन नंबर व पत्त्यासकट. ही वेबसाईट कम्प्युटर व मोबाईलवर देखील सहज उपलब्ध आहे.
याला सोबत म्हणून “Shirpur Search” नावाचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल ही तयार करण्यात आले आहे. आपण शिरपूर सर्च मध्ये जोडलेली माहिती आमच्या फेसबुक व यूट्यूब वर देखील टाकण्यात येईल. आपणास विनंती आहे की आपण त्या पेज ला लाइक करावे व यूट्यूब चॅनल ला Subscribe करावे.
जर आपणास काही मदत हवी असेल तर 807-00-11-222 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा आमच्या वेबसाईट वर असलेला ऑनलाईन संपर्क फॉर्म भरावा. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू. आपल्याला विनंती करतो कि आजच आपल्या व्यवसायाची माहिती आपल्या पत्त्यासकट व आपल्या मोबाईल नंबरसकट टाकावी.
धन्यवाद.
शिरपूर सर्च वेबसाईट
Shirpur.in
माहिती कशी टाकावी:
वेबसाईट वर आपण “माहिती भरा” किंवा “Add Listing” यावर क्लिक करून माहिती भरू शकता.
काय माहिती भरावी लागेल:आपल्याला व्यवसाय वृद्धीस मदत होईल अशी माहिती जसे की, व्यवसायाचे नाव, संपर्क पत्ता, संपर्क क्रमांक, सेवा, सुविधा, आपण विकत असलेले प्रोडक्टस, आपले सोशल मीडिया लिंक्स, इत्यादि.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shirpur.in/step-by-step-guide/
माहिती कशी भरावी याचा विडियो बघायला मिळेल?
नक्कीच. माहिती कशी भरावी याचा छोटा विडियो बनवला आहे. तो आपणास खालील लिंक वर बघावयास मिळेल.
https://youtu.be/dVwKk6-PFdM
मी मराठीत माहिती भरू शकतो का?
होय. आपण मराठीत माहिती भरू शकता. परंतु काही माहिती जसे की व्यवसायाचे नाव, पत्ता, त्याचा प्रकार (कॅटेगरी), वेबसाईटचे नाव, Keyword, सर्व प्रकारच्या लिंक्स ही फक्त इंग्रजीमध्येच असावी. तसे योग्य त्या ठिकाणी नमूद केले आहे.
मला माहिती भरतांना अडचण आल्यास काय करावे?
आपणास माहिती भरतांना अडचण आल्यास आम्ही दूसरा एक सोपा फॉर्म बनवला आहे. आपण तो भरू शकता अन्यथा आपण आम्हास 807-00-11-222 वर कॉल करू शकता.
https://shirpur.in/submit-information/
फेसबुक पेज ची लिंक:
https://www.facebook.com/shirpursearch/
यूट्यूब चॅनेल ची लिंक:
https://www.youtube.com/channel/UCGPgaBtiaYdFWrIbD4BvK4w/
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा