Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

पारंपारिक व्यवसायाबरोबर भोई समाज तरुणांनी इतर ही व्यवसाय करावा...श्री नितिनभोई,पारोळा



पारोळा प्रतिनिधी: पारंपरिक व्यवसायाबरोबर भोई समाजातील तरुणांनी इतर व्यावसायिक होण्यावर ही जोर द्यावा असे मला तरी वाटते. आजही भोई समाजातील काही तरुण समाजसेवा करता करता आपला पारंपरिक चणेभुटाणे, फ्रुटचा व्यावसायही सिनेमाहाँलच्या समोर, शहरातील चौकात चौकात, बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी करतांना दिसतात तर काही ठिकाणी शहरात, गांवपातळीवर हॉटेल व्यावसायिक, घाऊक, किरकोळ मच्छी विक्री  व्यावसायिक म्हणून ही कार्यरत असल्याचे दिसत आहेत; परंतु काही ठिकाणी राजकीय पक्षांचे बँनर बनविण्यात आणि इतरांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानत आहेत, मानतात मिळकतीचा स्त्रोत नसतांना... हे तरी कितपत योग्य आहे? हे ज्यांनी त्यांनी ठरवावे. आम्ही आज पारंपरिक व्यावसायिकपणा बरोबर काही ४/५ कंपन्यांच्या एजंसिज् चालविण्याचा तसेच परिसरात आयटीआय, गारमेंट, ईलेक्ट्रिकदुकान चालविण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यातून कुटुंबातील सदस्यांना मिळकती पुरते पुरत आहे. 

समाज बंधु भगिनींनो, 
येणाऱ्या मे किंवा जून महिन्यात लाँकडाऊन उघल्या नंतर नविन व्यवसाय व कमी भांडवलात कमाईची संधी आहे. पारंपरिक व्यवसायाबरोबर नवीन व्यवसायाकडे वळू या. आता तरी प्रेस्टीज इशू करू नये तो बाजूला ठेवू या त्यातुनच नाश्त्याच्या गाड्या लावण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती मिळवा. इतर राज्यातील तरुण नाश्ता विक्रीते भेळ सेंटरवाले सगळे आपल्या राज्यात घरी पळाले आहेत आपल्या भोई समाजातील मुलांना विनंती आहे, घरीच आहात तर वडा, समोसा, डोसा, सांभर, इडली-चटणी, पोहे, शिरा, उपमा, उपीट ,चायनीज असले नाष्ट्याचे पदार्थ बनवायचे घरी शिका. पाणीपुरी, भेळ बद्दल पण माहिती घ्या. आई, बहीण,आज्जी यांच्या सारख्याकडून शिकून घ्या.. इतर राज्यातील तरुण येण्याच्या आत आपल्या पोरांच्या हातगाड्या लागल्या पाहिजेत. चांगली संधी चालून आली आहे परत म्हणू नका काम मिळत नाही म्हणून... 
दादा, आण्णा, भाऊ, आमचे काळीज असले नेते यांच्या राजकीय ताकतीचा वापर करून गाडी लावायची परवानगी घ्या नगर पालिकेकडून महापालिकेकडून... आता हक्काने जागा शोधा नाश्ताच्या हातगाडी लावायला त्यांची मदत घ्यावी. अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही तरी आपल्या भोईसमाजातील तरुण, गरजू व होतकरू मंडळीला कळकळीची विंनती आहे की, परंपरागत व्यवसायाबरोबर नवीन व्यवसायाची संधचा फायदा घेऊन आपली व आपल्या भोई समाजाची प्रगती करून घेऊ या





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध