Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ एप्रिल, २०२०
पिंगळवाडे जि.प. शाळेत क्वारंटाईन केलेल्या दोघांनी केले असे ...
शिवाजी पारधी ,तरुण गर्जना :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींना
गावाच्या बाहेरील इमारतीत किंवा जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. अनेक
जण हा वेळ अन इच्छेने काढत आहेत. तर अनेक गावात ह्या व्यक्ती क्वारंटाईन न राहता
नियमाच्या विरुद्ध वागत आहेत.
अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील अमोल व दिनेश या युवकांनी
त्यांच्या कृतीतून आपले वेगळपण दाखवून दिले आहे. अमोल विठ्ठल देशमुख (वय २५) हा
पुणे येथून १० एप्रिल रोजी तर दिनेश नगराज पाटील (वय ३०) हा इंदोर येथून दि. १६ एप्रिल रोजी गावात आले.
गावातील ग्रामस्थ व पोलिस पाटील गजेंद्र पाटील यांनी त्यांना जि.प. शाळेत क्वारंटाईन केले. क्वारंटाईन काळात अनिच्छेने
वेळ घालवण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग करून काहीतरी चांगले काम करावे अश्या विचाराने
त्यांनी दररोज जिल्हा परिषद शाळेची साफसफाई करणे सुरू केले. तसेच शाळेच्या आवारात
असलेल्या रोपांची काळजी घेऊन त्यांना दररोज पाणी टाकण्यास सुरुवात केली. गावाचे
पोलिस पाटील गजेंद्र पाटील व मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी त्यांना
प्रोत्साहन देत सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.
"ज्या
शाळेत आपण शिकलो त्या शाळेची सेवा करण्याची मिळालेली ही संधी आहे, अशी भावना या दोघांनी
व्यक्त केली."
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


पिंगळवाडे शाळेत क्वारंटाईन केलेल्ल्या दोघा युवकांचे शाळेप्ररी समाजऋण प्रेरक..
उत्तर द्याहटवा