Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर शहरातील साळीवाडा भागातील मयत महिलेसह तिच्या पतीच्याही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
अमळनेर शहरातील साळीवाडा भागातील मयत महिलेसह तिच्या पतीच्याही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
अमळनेर प्रतिनिधी: शहरातील साळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका कोरोना संशयित महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असताना त्या मयत महिलेसह तिच्या पतीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अमळनेर शहरात खळबळ माजली आहे,आता अमळनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.
जळगाव येथे उपचार घेत असतांना त्या महिलेचे निधन झाल्यानंतर महिलेचा तपासणी अहवाल येणे बाकी असतानाच दक्षता म्हणून महिलेच्या निवासस्थानापासून एक किमी झोनची फवारणी करण्यात आली होती.त्यानंतर महिलेचा तपासणी अहवाल येण्याची प्रतीक्षा सुरू होती,याव्यतिरिक्त त्या महिलेचा पती देखील जळगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना त्याचीही कोरोना तपासणी करण्यात आली होती,अखेर त्या दोन्ही पती पत्नीचे अहवाल आज रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांनी दिल्यानंतर प्राशसन खळबळून जागे झाले.
अमळनेरात रात्रीच प्रांतांच्या दालनात तातडीची बैठक...
सदर महिलेने सुरवातीलाशहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याचीही माहिती मिळाली आहे.दि 18 मार्च रोजी तिचा मुलगा पुणे येथून अमळनेर येथे आला होता,कोरोना सायलंट कॅरीअर म्हणून त्यापासूनच ही लागण झालेली असावी शक्यता वर्तविली जात आहे.पॉझिटिव्हची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात रात्री 10 नंतर तातडीची बैठक घेण्यात आली,यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ,डीवायएसपी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,बीडीओ संदीप वायाळ,न प च्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड,आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे,डॉ विलास महाजन,न प चे आरोग्य निरीक्षक वाय एस चव्हाण, उपस्थित होते,रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती,सदर बैठकीत महिलेच्या निवासस्थानापासून संपूर्ण चौफेर एक किंमी चा परिसर सील करण्यासदर्भात चर्चा झाली.दरम्यान सदर पती व पत्नीचे शहरातील शिवाजी मार्केट येथे किराणा दुकान आहे.सदर कुटुंबातील आठ लोकांना स्वब घेण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
जनतेने घाबरू नये घरातच थांबावे
जनतेने घाबरून न जाता घर सोडून बाहेर जाऊ नये, स्वच्छता बाळगावी, मानसिक तंदुरुस्त राहावे,तसेच कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ राजेंद्र शेलकर डॉ प्रकाश ताळे, डॉ जी एम पाटील यांनी केले आहे.प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी आदी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.अमळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या आता 3 झाली असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. आणि हा भाग दाट वस्तीचा असल्याने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा