Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
शेगांव परिसरातील गावठी दारू अड्डा केला उद्धवस्त
शेगाव:प्रतिनिधी गुप्त माहितीवरुन धाड टाकून पूर्णा नदीपात्रातील दुसराही गावठी दारू अड्डा ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी उद्वस्त केला . या कारवाईत १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार एपीआय गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात - पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे , पोलीस नाईक,रवींद्र बराटे , कैलास सुरडकर , संतोष खरात यांच्या पथकाने ग्राम खातखेड शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात धाड टाकली .
यावेजी एकनाथ भगवान तलवारे बांच्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकली . त्याचे कब्जातून पत्राचे २१ डब्या मधील २१० लिटर मोहसडवा किंमत १०,५०० रु.चा व ९लिटर दारू किंमत ९०० रु.तसेच साहित्य किंमत ११०० रुपये असा एकूण १२ , ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला . याप्रकरणी पोउपनि अरविंद कुमरे यांच्या तक्रारीवरून एकनाथ तलवारे विरुद्ध कलम ६५ ( ई ) ( फ ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम १८८ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या . कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा