Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
लाॅकडाऊन चा फायदा घेत शिरपूरात “घरफोडी”…! रोख रक्कमसह सोने दागिन्यांवर “डल्ला”
शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहरात बंद घरात घरफोडी झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस झाली असुन घरातील १ लाख २४ किंमतीचे रोख रक्कमसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर शहरातील साने गुरुजी नगर प्लाट नं १७ येथील रहिवासी भाग्यश्री शालीकराम पाटील वय ४१ यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी म्हटले की,लॉकडाऊन काळात दि २१ मार्च पासून दि १६ रोजी दरम्यान घर बंद होते.
आज बघितले असता घराच्या पुढील दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरांनी घरातील लोखंडी कपाटातील.१ लाख दहा हजार रोख रक्कम व १२ हजार किंमतीचे ५ तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस व ५ ग्रँम वजनाचे २ हजार किंंमती सोन्याचे असे एकुण १ लाख २४ हजार किंमतीचे रोख रक्कमसह मुद्देमाल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा